‘सफाई कर्मचाऱ्यांना देखील…’, नीतू कपूर यांना असं का म्हणाली कतरीना कैफ हिची आई?

नीतू कपूर लेकाची एक्स गर्लफ्रेंड कतरीना कैफ हिला असं काय म्हणाल्या, ज्यामुळे संतापलेल्या अभिनेत्रीच्या आईने थेट पोस्ट करत दिलं सडेतोड उत्तर

'सफाई कर्मचाऱ्यांना देखील...', नीतू कपूर यांना असं का म्हणाली कतरीना कैफ हिची आई?
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 3:58 PM

मुंबई : नकळत अभिनेत्री नीतू कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिची आई सुझान टरक्वोट यांच्यामध्ये ‘पोस्ट वॉर’ सुरु झाला आहे. नुकताच नीतू कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्यांनी मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर याच्या एक्स गर्लफ्रेंड कतरीना कैफ आणि दीपिका पादुकोण यांच्यावर निशाणा साधला. पण ही गोष्ट याठिकाणी संपली नसून करतरिना हिची आई सुझान यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नीतू कपूर यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र नीतू कपूर आणि सुझान टरक्वोट यांच्यावर रंगलेल्या वादाची चर्चा रंगत आहे.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न केलं. आज दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. त्यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली असली तरी, रणबीर आणि कतरिना यांचं नातं आजही चर्चेत असतं. अशात नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

नीतू कपूर इन्स्टाग्रावर स्टोरीवर म्हणाल्या, ‘त्याने तिला ७ वर्ष डेट केलं, याचा अर्थ असा नाही होत की , तो तिच्यासोबत लग्न करेल. माझ्या काकांनी ६ वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतलं  आणिआज ते डीजे आहेत….’ नीतू यांच्या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये रणबीर आणि कतरिना यांच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या आहे. रणबीर आणि कतरिना यांनी एकमेकांना ७ वर्ष डेट केलं. पण अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नीतू यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या. अशात या वादामध्ये कतरिना कैफ हिची आई सुझान टरक्वोट यांनी उडी घेतली आहे. सुझान टरक्वोट इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘मला असे संस्कार दिले आहेत, ज्याठिकाणी तुम्ही सफाई कर्मचाऱ्याचा देखील तेवढाच आदर करता, जेवढा एका कंपनीच्या सीईओचा…’ सध्या सुझान यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर, कतरिना कैफ हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केलं. तर रणबीर कपूर याने अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. रणबीर आणि आलिया यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे. पण रणबीर आणि आलिया यांनी लेकीचा चेहरा अद्याप चाहत्यांना दाखवलेला नाही.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...