एकाच रंगाचे कपडे घालून विक्की कौशल, कतरिना ‘सरदार उधम’च्या स्क्रीनिंगला, चाहते म्हणतात, आता तरी प्रेमाची कबुली द्या!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या अफेअरच्या बातम्या खूप दिवसांपासून चर्चेत आहेत. पण हे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोलत नाहीत. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. परंतू दोघांनी ही यावर मौन बाळगले आहे.

एकाच रंगाचे कपडे घालून विक्की कौशल, कतरिना 'सरदार उधम'च्या स्क्रीनिंगला, चाहते म्हणतात, आता तरी प्रेमाची कबुली द्या!
vicky-katrina
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 2:32 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या अफेअरच्या बातम्या खूप दिवसांपासून चर्चेत आहेत. पण हे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोलत नाहीत. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. परंतू दोघांनी ही यावर मौन बाळगले आहे. सध्या हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विकी कौशलचा सरदार उधम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कतरिनाने हजेरी लावलेली दिसली.

विक्की कौशलचा चित्रपट सरदार उधम 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. जिथे कतरिना कैफही विकीच्या कुटुंबासह पाहायला मिळाली.

दोघांनी घातले होते एकाच रंगाचे कपडे

सरदार उधम या चित्रपटाच्या स्क्रीनिंग फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी एकाच रंगाचे कपडे घालताना दिसत आहेत. यावेळी कतरिनाने पांढरा टी-शर्ट घातला होता, तर विकीनेसुद्धा पांढरा शर्ट घातला होता. कॅटरिना कारच्या आत बसलेली दिसत असताना विकी फोटोग्राफर्ससाठी पोज देण्यात व्यस्त होता. यांच्या नात्याबद्दल आता त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अफेअर बातमी समोर आली होती

काही काळापूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रोकाची बातमी सोशल मीडियावर समोर आली होती. ते पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. पण काही त्यावेळी कतरिनाच्या टीमने ही अफवा असल्याची गोष्ट स्पष्ट केली. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. नेटकरांना विकी आणि कतरिनाची जोडी खूप आवडली आहे.

विकी कौशलचे पुढील चित्रपट

विकी कौशल सरदार उधम नंतर सॅम बहादूरमध्ये दिसणार आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो सरदार उधममध्ये उधम सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम वर रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.दुसरीकडे, कतरिना कैफचा सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त ती टायगर 3, फोन भूथ आणि जी ले जरा या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

इतर बातम्या :

भार्गवी चिरमुलेने नवरात्रीचं निमित्त साधत सांगितलं ‘तात’ साडीचं महत्त्व, तुम्हाला माहितेय का?

बी टाऊनच्या अशा पार्ट्या, ज्यात कलाकार एकमेकांशीच भिडले, हाणामारीमुळे नेहमीच राहिल्या चर्चेत!

Happy Birthday Rakul Preet Singh | राष्ट्रीय स्तरावरील गोल्फपटू म्हणूनही नावाजलीये रकुल प्रीत सिंह, आता बॉलिवूडमध्ये गाजवतेय नाव!

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.