संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय. आज (24 ऑक्टोबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा धूमधडाक्याने दिवाळी साजरी करत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एक आठवडा आधीच दिवाळी सुरू झाली आहे. विविध कलाकारांकडून पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय.
विकी कौशल आणि कतरिना कैफने दिवाळीच्या पार्ट्यांना एकत्र हजेरी लावली. लग्नानंतर या दोघांची ही पहिलीच दिवाळी आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरने ग्लॅमरस अंदाजातील फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या एका फोटोशूटचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.