Neetu Katrina | “रणबीरची आई तुला पसंत का करत नाही?”; नीतू कपूर यांच्याविषयीच्या प्रश्नावर कतरिना म्हणाली..

‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं नीतू कपूर यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर कतरिनाच्या आईची पोस्ट व्हायरल झाली.

Neetu Katrina | रणबीरची आई तुला पसंत का करत नाही?; नीतू कपूर यांच्याविषयीच्या प्रश्नावर कतरिना म्हणाली..
Ranbir, Neetu Kapoor and Katrina KaifImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 12:37 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नुकतीच एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्यांनी रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफला टोमणा मारल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर कतरिनाच्या आईनेही पोस्ट शेअर करत त्यांना अप्रत्यक्ष उत्तर दिल्याची चर्चा होती. या सर्व वादादरम्यान आता कतरिनाच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला होता की, रणबीरची आई नीतू तिला का पसंत करत नाही? त्यावर कतरिनाने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका रेडिट अकाऊंटने 2015 मधील कतरिनाच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. रणबीर आणि कतरिना हे जवळपास सहा ते सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तर गेल्या वर्षी रणबीरने आलिया भट्टशी लग्न केलं. 2021 मध्ये कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली.

“नीतू कपूर तुला नापसंत का करतात?”

नीतू कपूर तुला नापसंत करतात का, असा प्रश्न कतरिनाला जुन्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणते, “मी स्वत: हे ऐकून आश्चर्यचकीत झाले आहे. पण कदाचित या अफवांसाठी मीच जबाबदार आहे. याचा संपूर्ण दोष मी स्वत:ला देईन. कारण गेल्या आठ-नऊ वर्षांपासून मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुठेच काही बोलले नाही. मी एक संवेदनशील महिला आहे. मला कधी कधी त्या सत्याचा स्वीकार करणं कठीण होतं, जिथे प्रेमाचा विषय असतो.”

हे सुद्धा वाचा

नीतू कपूर यांच्याविषयी काय म्हणाली कतरिना?

याविषयी कतरिना पुढे म्हणाली, “जर तुम्ही मला रणबीरच्या आईसोबतच्या नात्याबद्दल विचारत असाल तर त्या अत्यंत सुंदर महिला आहेत. त्यांचं मी खूप कौतुक करते. त्यांनी फार कमी वयात करिअरची सुरुवात केली आणि यश मिळवलं. त्यांनी अशा व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, ज्यांच्याशी त्या खूप प्रेम करायच्या. एक व्यक्ती म्हणून त्या खूप चांगल्या आहेत, असं मला वाटतं. मी रणबीरच्या प्रत्येक कुटुंबीयाशी भेटले. फक्त नीतूजीच नाही, तर ऋषी कपूरसुद्धा खूप प्रेमळ आहेत.”

कतरिनाला फोटोमधून केलं क्रॉप?

या मुलाखतीत कतरिनाला एका फोटोविषयीही प्रश्न विचारण्यात आला होता. नीतू कपूर यांनी जाणीवपूर्वक तुला एका फोटोमधून क्रॉप केलं होतं का, असं तिला विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “मी सोशल मीडियावर नाही, त्यामुळे त्याबद्दल मला माहीत नाही.”

नीतू कपूर यांची पोस्ट नुकतीच चर्चेत आली. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. नीतू कपूर यांची ही स्टोरी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध रणबीर कपूरच्या भूतकाळातील रिलेशनशिप्सशी लावला. त्यावरून काहींनी नीतू यांच्यावर टीकासुद्धा केली.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.