Katrina-Vicky : कतरिना कैफ चाहत्यांना, कुटुंबाला देणार ‘गुडन्यूज’! विकी कौशल याचं मोठं वक्तव्य

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | कैफ, कौशल कुटुंबात आनंदाचं वातावरण... कतरिना लवकरच देणार 'गुडन्यूज'? विकी कौशल असं म्हणाला तरी काय?.. सध्या सर्वत्र विकी कौशल याच्या वक्तव्याची चर्चा...

Katrina-Vicky : कतरिना कैफ चाहत्यांना, कुटुंबाला देणार 'गुडन्यूज'! विकी कौशल याचं मोठं वक्तव्य
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:43 AM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. पण दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीही वक्तव्य केलं नाही. पण लग्नानंतर परफेक्ट कपल म्हणून विकी – कतरिना यांची ओळख निर्माण झाली आहे. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. ९ डिसेंबर २०२१ मध्ये विकी आणि कतरिना यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून अनेकदा कतरिना कैफ हिच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा रंगली. सध्या विकी आगामी ‘ग्रेट इंडियन फॅमिली’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये विकी व्यस्त आहे. विकी कौशलने सांगितले की, कतरिनावर कुटुंबाकडून लग्नानंतर ‘गुडन्यूज’ देण्यासाठी दबाव आहे की नाही.

सध्या विकी ‘ग्रेट इंडियन फॅमिली’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने पत्नी कतरिना हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. शिवाय अभिनेत्याने कुटुंबियांबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र कतरिना आणि विकी यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखती दरम्यान, विकी कौशल याला, ‘कतरिनावर कुटुंबाकडून लग्नानंतर ‘गुडन्यूज’ देण्यासाठी दबाव आहे का?’ असा प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘कोणाही कतरिना हिच्या कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकत नाही. सांगायचं झालं तर ते कूल आहेत…’

हे सुद्धा वाचा

चाहते विकी कौशल आणि कतरिना कैफची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. जेव्हा विकीला विचारण्यात आले की तो आणि कतरिना कैफ ऑनस्क्रीन एकत्र येण्याची शक्यता आहे का? यावर अभिनेता म्हणाला, ‘मी कतरिना हिला सेटवर सांगितलं होतं, माझे दोन दिग्दर्शक आहेत. एक सेटवर आणि एक घरी… जे मला कायम चांगल्या गोष्टी सांगत असतात..’ सध्या सर्वत्र विकी कौशल याची चर्चा रंगली आहे.

कतरिना कैफ हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा २०२३ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता सलमान खान याच्यासोबत कतरिना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.