Katrina Kaif | कतरिना कैफ हिला पाहताच चाहत्यांची झुंबड, अभिनेत्रीच्या कर्मचाऱ्यांनी थेट ढकलले, व्हिडीओ व्हायरल

कतरिना कैफ ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कतरिना कैफ ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान याचे चाहते चित्रपटाची सातत्याने वाट पाहत आहेत.

Katrina Kaif | कतरिना कैफ हिला पाहताच चाहत्यांची झुंबड, अभिनेत्रीच्या कर्मचाऱ्यांनी थेट ढकलले, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 3:11 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही सध्या चर्चेत आहे. कतरिना कैफ ही काही दिवसांपूर्वीच पती विकी काैशल याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. विकी आणि सारा अली खान यांच्या जरा हटके जरा बचके (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना हा धमाकेदार चित्रपट पाहण्यास कतरिना कैफ हिने सांगितले होते. विशेष म्हणजे विकी काैशल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले होते. इतकेच नाही तर जरा हटके जरा बचके या चित्रपटाने धमाकेदार कमाई ही नक्कीच केलीये. सारा आणि विकीची जोडी प्रेक्षकांना आवडलीये.

कतरिना कैफ ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा टायगर 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर 3 मध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. सलमान खान याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. टायगर 3 हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक आहे.

नुकताच कतरिना कैफ ही न्यूयॉर्कमधून भारतामध्ये परतली आहे. न्यूयॉर्कमध्ये खास सुट्टया घालवण्यासाठी कतरिना कैफ आणि विकी काैशल हे गेले होते. नुकताच आता न्यूयॉर्कवरून कतरिना कैफ ही भारतामध्ये परतली आहे. कतरिना कैफ हिचा सध्या विमानतळावरील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

video

कतरिना कैफ हिला विमानतळावर पाहून तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. कतरिना कैफ ही चाहत्यांना अगोदर हाय, हॅलो करताना दिसली. चाहत्यांनी कतरिना कैफ हिच्या भोवती गर्दी करण्यास सुरूवात केली. लोक कतरिना कैफ हिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होते. कतरिना कैफ ही सेल्फी घेण्यासाठी थांबली देखील होती.

कतरिना कैफ हिच्या भोवतीची गर्दी वाढताना दिसली. इतकेच नाही तर या गर्दीमधून कतरिना कैफ हिला निघणे देखील अवघड झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर कतरिना कैफ हिच्या सुरक्षारक्षकाने गर्दी करणाऱ्या लोकांना दूर केले. यावेळी काही लोकांना धक्काबुक्की झाल्याचे देखील बघायला मिळाले. आता कतरिना कैफ हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.