KBC 14 मध्ये जया बच्चन यांनी विचारला असा प्रश्न; बिग बींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला!

जया यांनी मुलासमोर घेतली अमिताभ बच्चन यांची शाळा; पहा Video

KBC 14 मध्ये जया बच्चन यांनी विचारला असा प्रश्न; बिग बींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला!
अमिताभ बच्चन, जया बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 6:20 PM

मुंबई- ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 व्या (KBC 14) सिझनमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना एक सरप्राइज मिळाला. या सरप्राइजची त्यांना कल्पनाच नव्हती. आतापर्यंत केबीसीमध्ये बिग बी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांना प्रश्न विचारत होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बींना प्रश्न विचारले जाणार आहेत. कारण या शोमध्ये बिग बींची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी एण्ट्री केली आहे. या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये जया आणि अभिषेक मिळून बिग बींना मजेशीर प्रश्न विचारताना दिसतात.

या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी बिग बींना असा प्रश्न विचारला, की त्यांची बोलतीच बंद झाली. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे कोणते ऑप्शनसुद्धा नव्हते.

हे सुद्धा वाचा

“आपण दोघं जर एखाद्या आयलँडवर अडकलो, तर तुम्ही कोणत्या 3 गोष्टींची निवड कराल”, असा प्रश्न जया बच्चन विचारतात. त्यावर अमिताभ बच्चन त्यांना पर्याय कोणकोणते आहेत असं विचारतात. मात्र कोणत्यात पर्यायाशिवाय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे असं जया सांगतात. हे ऐकून बिग बी चांगलेच पेचात पडतात.

जया बच्चन इथेच थांबत नाहीत. जेव्हा अभिषेक बच्चन सूत्रसंचालकाच्या खुर्चावर बसतो तेव्हा जया बिग बींकडे पाहून म्हणतात, “मी पाहिलं तर नाही, मात्र ऐकलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कामाने किंवा स्वभावाने प्रभावित होता, तेव्हा त्यांना फुलं आणि चिठ्ठी पाठवता. तसं मला तर तुम्ही कधी कोणती चिठ्ठी पाठवली नाही.”

यावर नेमकं उत्तर काय द्यावं हे बिग बींना सुचत नाही. ते म्हणतात, “हा कार्यक्रम आता सार्वजनिक होतोय आणि ही चुकीची गोष्ट आहे.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. अभिषेकसुद्धा या सर्व गोष्टींची मजा घेताना दिसतो.

जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबतचा हा खास एपिसोड 11 ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे. यादिवशी बिग बींचा 80 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त या खास एपिसोडचं आयोजन करण्यात आलं आहे. केबीसीच्या सेटवर बिग बींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....