KBC 14: साडेसात कोटींच्या प्रश्नावर लागला लॉक; हरणार की इतिहास रचणार?

'केबीसी'च्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला; बिग बीसुद्धा होणार भावूक!

KBC 14: साडेसात कोटींच्या प्रश्नावर लागला लॉक; हरणार की इतिहास रचणार?
KBCImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 7:26 PM

मुंबई- अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) या शोला दुसरा करोडपती मिळाला आहे. शाश्वत गोयल (Shashwat Goel) या स्पर्धकाने एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं आहे. आता ते या खेळाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. शाश्वत यांच्यासमोर साडेसात कोटी रुपयांचा प्रश्न आहे. या जॅकपॉट प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

केबीसीच्या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये शाश्वत गोयल हे रडताना दिसत आहेत. शाश्वत रडत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी एक जण म्हणतोय की त्यांना आईचा आशीर्वाद मिळाला आहे. जे काही घडलं ते त्यांच्या आईमुळे घडलंय. त्यानंतर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन त्यांच्यासमोर साडेसात कोटींचा प्रश्न सादर करतात.

हे सुद्धा वाचा

2013 पासून कौन बनेगा करोडपतीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याचं शाश्वत या शोमध्ये सांगतात. आपल्या मुलाने एकदा तरी केबीसीच्या हॉटसीटवर बसावं, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र आज जेव्हा ते हॉटसीटवर बसून एक कोटी रुपये जिंकले आहेत, तेव्हा त्यांची आई या जगात नाही.

शोमध्ये शाश्वत यांना रडताना पाहून अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यातही अश्रू येतात. शाश्वत एका प्रश्नाचं उत्तर लॉक करायला सांगतात, त्यानंतर बिग बी त्या उत्तराला लॉक करतात. इथेच हा प्रोमो संपतो. त्यामुळे या एपिसोडची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

शाश्वत गोयल यांच्या आधी कविता चावला नावाच्या एका महिलेनं केबीसी 14 मध्ये एक कोटी रुपये जिंकले होते. कविता यांनी फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतलं होतं. त्यांना पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र वडिलांनी त्यासाठी परवानगी दिली नाही.

कौन बनेगा करोडपती 14 च्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये बिग बींचा वाढदिवससुद्धा साजरा केला जाणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी बिग बींच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन सहभागी होणार आहेत. दोघं मिळून बिग बींसोबत केबीसीचा खेळ खेळतात. या एपिसोडच्या प्रोमोमध्येही बिग बी भावूक होताना पहायला मिळतात.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.