Kaun Banega Crorepati 15 : बिग बींची गॅरंटी, अमिताभ यांचं अचूक उत्तर देणाऱ्या वर्षासोबत डिनर; काय आहे किस्सा?
Kaun Banega Crorepati 15 : 'कोन बनेगा करोडपती 15' मध्ये अचूक उत्तर देणाऱ्या वर्षासोबत डिनर, अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केलं वचन, काय आहे किस्सा? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा... सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Kaun Banega Crorepati 15 : महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत त्यांच्या अनेक चाहत्यांना वचन दिलं आणि ते पूर्ण देखील केलं. नुकतात अमिताभ बच्चन यांनी वर्षा तारा सरावगी यांना दिलेलं वचन देखील पूर्ण केलं आहे. वर्षा तारा सरावगी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘कोन बनेगा करोडपती 15’ च्या एपिसोडमध्ये वर्षा तारा सरावगी स्पर्धक म्हणून उपस्थित होत्या. वर्षा यांनी प्रश्न – उत्तरांचा खेळ सोडण्यापूर्वी अनेक प्रश्नाची अचूक उत्तरं दिली आणि 12,50,000 रुपये जिंकले.
अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं की, जो स्पर्धक 10 पैकी 10 प्रश्नांची अचूक उत्तरं देईल, त्या स्पर्धकाला बिग बी त्यांच्या घरी जेवणाचं निमंत्रण देतील… असं वचन अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना दिलं होतं. पूर्ण सिझनमध्ये 4 स्पर्धकांना दिलेलं वचन बिग बी यांनी पूर्ण केलं. त्यामध्ये वर्षा देखील एक होत्या.
वर्षा तारा सरावगी यांनी सांगितल्यानुसार, ‘मी आयुष्यात 11 वर्ष स्वतःच्या पायावर उभी राहू शकली नाही. माझ्या आईने विचार केली मी शिकली नाही तर, माझं आयुष्यात काय होईल? मोठ्या कठीण प्रसंगात माझं एका शाळेत एडमिशन झालं. आज मी फक्त माझ्या आईमुळे स्वतःच्या पायावर भक्कम उभी आहे. मला हे हॉटसीट माझ्या आईला समर्पित करायचं आहे.’
धक्कादायक गोष्ट म्हणजे वर्षा 3 वर्षांचा असताना त्यांना पोलिओ झाला होता. बिग बी म्हणाले, ‘माझ्या डोळ्यात अनेकदा आनंदी अश्रू आले. त्यामधील हा तो एक क्षण आहे. कारण कुटुंब आपली सर्वात मोठी ताकद आणि आधार असतो…’
पुढे वर्षा म्हणाल्या, ‘जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा अनेकांनी विचार केला. पण माझे पती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत आणि आम्हाला एक मुलगाही आहे. तो कायम माझ्यासोबत असतो. मी कायम विचार करत त्यांनी पत्नी म्हणून माझी निवड का केली?’ असं म्हणत वर्षा यांनी पतीचं कौतुक केलं.
रॅपिड फायर राऊंडमध्ये अचूक उत्तर देणाऱ्या वर्षा यांना जेवणासाठी बोलावलं
नुकताच, बिग बी यांनी वचन पूर्ण केलं. वर्षा तारा सरोगी यांना संपूर्ण कुटुंबासह डिनरसाठी आमंत्रित केले. तीन तास चाललेल्या या भेटीत अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण कुटुंबासह घरी डिनर केलं. एवढंच नाही तर, खुद्द अमिताभ बच्चन यांनी वर्षा यांच्या कुटुंबियांचं स्वागत केलं.