KBC 15: ‘दुसऱ्या जातीत लग्न करणं म्हणजे…’, आंतरजातीय विवाहाबद्दल अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांनी सांगितलं त्यांच्या आयुष्यातील मोठं सत्य, आंतरजातीय विवाहाबद्दल बिग बी यांचं धक्कादायक वक्तव्य... सध्या सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा...

KBC 15: 'दुसऱ्या जातीत लग्न करणं म्हणजे...', आंतरजातीय विवाहाबद्दल अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 10:16 AM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कोन बनेगा करोडपती १५’ या शोमुळे चर्चेत आहेत. शोमध्ये सामील होत अनेक स्पर्धकांनी प्रश्नांची अचूक उत्तरं देत धनराशी कमावली. शोमध्ये बिग बी स्पर्धकांसोबत अनेक विषयांवर गप्पा मारत असतात. एवढंच नाही तर, बिग बी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्यमय गोष्टी देखील स्पर्धक आणि चाहत्यांसोबत शेअर करतात. ‘कोन बनेगा करोडपती १५’ शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंश राय बच्चन यांच्यासंबधी एक किस्सा सांगितला. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांनी सांगितलेल्या त्या घटनेची चर्चा रंगत आहे.

‘कोन बनेगा करोडपती १५’ शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बी यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट प्रश्नासोबत एपिसोडची सुरुवात केली. प्रश्नाचं अचूक उत्तर देत योजना यादव बिग बी यांच्यासोबत हॉट सीटपर्यंत पोहोचतात. बिग बी, योजना यादव यांना १ हजार रुपयांसाठी पहिला प्रश्न विचारतात, ‘किशोर कुमार स्टारर या सिनेमाचं पूर्ण शिषर्क सांगा… चलती का नाम….’

प्रश्नासाठी पर्याय होते, पवन, सांस, अनादी, गाडी… योजना यादव गाडी हे उत्तर देत १ हजार रुपये जिंकतात. पुढे प्रश्न-उत्तरांचा खेळ ३ लाख २० हजार रुपयांवर येवून पोहोचतो. ३ लाख २० हजार रुपयांसाठी बिग बी, योजना यांना विचारता, ‘बेगम अख्तर यांना कलाकार म्हणून करिअर करण्याची प्रेरणा कोणत्या कवीकडून मिळाली?’

अमिताभ बच्चन यांनी उत्तरासाठी विजय लक्ष्मी पंडित, महादेवी वर्मा, सरोजिनी नायडू, सुभद्रा कुमारी चौहान असे पर्याय दिले. पण या प्रश्नाचं उत्तर योजना यांना देता आलं नाही. अखेर त्यांनी लाइफलाइन ऑडियन्स पोलची निवड करत अचूक उत्तर दिलं. प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू.. या प्रश्नानंतर बिग बी यांनी आंतरजातीय विवाहाबद्दलसमोठं वक्तव्य केलं.

आंतरजातीय विवाहाबद्दल बिग बी यांचं वक्तव्य

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘एक सत्य सांगताना मला जरा संकोच वाटत आहे. सरोजिनी नायडू माझ्या वडिलांच्या मोठ्या चाहत्या होत्या. माझ्या वडिलांनी आंतरजातीय विवाह केला होता. माझ्या आई तेजी शीख कुटुंबातील होत्या. जेव्हा आम्ही अलाहाबादमध्ये राहत होतो तेव्हा दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी लग्न करणे पाप मानलं जायचं.’

पुढे बिग बी म्हणाले, ‘अशात जेव्हा माझे वडील आईला घेऊन अलाहाबादला गेले. तेव्हा अनेकांनी विरोध केला. तेव्हा सरोजिनी नायडू या पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांनी माझ्या वडिलांचं सांत्वन केलं. आनंद भवनात राहणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंशी त्यांनी वडीलांची ओळख करून दिली. वडिलांची ओळख करुन देताना त्यांनी जे शब्द वापरले ते माझ्या आजही लक्षात आहेत, कवी आणि त्यांच्या कवितांना भेटा.’ सध्या सर्वत्र बिग बी यांची चर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.