पापाराझींनी चुकीचे नाव घेताच अभिनेत्रीचा संताप म्हणाली… तर, काहींनी चक्क ‘डोसा’ म्हणून चिडवलं
पापाराझींनी अभिनेत्रीचे चुकीचे नाव घेत तिला चिडलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्री संतापलेली पाहायला मिळाली. तसेच तिने स्वत:चा राग आवरत पापाराझींना स्पष्ट शब्दात सुनावलं.
जिथे सेलिब्रिटी तिथे पापाराझी असतातच. पण कित्येकवेळेला पापाराझींसोबत सेलिब्रिटींचे वाद झालेले आपण पाहतो. किंवा सेलिब्रिटींना कोणत्या ना कोणत्या कारणाने पापाराझींचा राग आलेलाही आपण पाहतो. असंच काहीस घडलं आहे एका अभिनेत्रीसोबत.
फोटो काढत असताना पापाराझींवर एक अभिनेत्री चिडलेली पाहायला मिळाली. पापाराझींनी तिचं चुकीचे नाव पुकारल्याने अभिनेत्रीला राग आल्याचं समोर आलं. या अभिनेत्रीने तिचा राग आवरत शांतपणे पापाराझींना सुनावलं देखील.
पापाराझींनी नावाचा चुकीचा उल्लेख केल्यानं संताप
ही अभिनेत्री आहे कीर्ती सुरेश. कीर्ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे सध्या चर्चेत आली आहे. 25 डिसेंबर रोजी कीर्तीचा पहिला बॉलिवूड सिनेमा ‘बेबी जॉन’ प्रदर्शित झाला. कीर्तीने या चित्रपटात वरुण धवन आणि वामिका गब्बी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली असून, सध्या हे तिघेही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
कीर्तीचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात ती पापाराझींवर थोडीशी चिडलेली दिसली. तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख आणि तिला ‘डोसा’ अशी हाक मारल्याने ती चिडली होती.
पापाराझींकडूनच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कीर्ती मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. तेव्हा पापाराझींनी कीर्तीला ‘क्रिती’ अशी हाक मारायला सुरुवात केली, ज्यामुळे अभिनेत्री नाराज झाली. तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की, तिचे नाव क्रिती नसून ‘कीर्ती’ आहे.
काहींनी ‘डोसा’ म्हणून हाक मारली
यानंतर काहीजण तिला ‘डोसा’ अशीही हाक मारू लागतात. काही दिवसांपूर्वी तिला डोसा खूप आवडतो, असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला. पण अशी हाक मारल्यानंतर तिने स्पष्ट प्रतिक्रिया दिली. हसतच शांतपणे कीर्तीने पापाराझींना उत्तर दिलं. तिने म्हटले की, ‘किर्ती डोसा नाही, कीर्ती सुरेश आहे आणि मला डोसा आवडतो.’ नंतर ती संतापून तेथून निघून गेली नाही तर, तिने हसतच कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
View this post on Instagram
कीर्तीने यावेळी स्लीव्हलेस डेनिम ड्रेस परिधान केला होता, त्यावर ती मंगळसूत्र फ्लाँट करायला विसरली नाही. अलीकडेच अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर लगेचच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट रीलिज झाला.
कीर्तीचा ‘बेबी जॉन’ सिनेमा चर्चेत
कीर्तीचा ‘बेबी जॉन’ सिनेमा थलपथी विजय, सामंथा आणि ॲटली यांच्या ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 13 कोटींची कमाई केली होती. कॅलिस दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ हा बॉलिवूड चित्रपट निर्माता म्हणून ॲटलीचा पहिला चित्रपट आहे
कीर्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने अलीकडेच 12 डिसेंबर रोजी गोव्यात तिचा बालपणीचा मित्र आणि दीर्घकालीन बॉयफ्रेंड अँटोनी थट्टिलशी लग्न केले. यावेळी सिनेविश्वातील आघाडीचे अनेक कलाकार उपस्थित होते. गोव्यात या लग्नासाठी त्रिशा कृष्णन, थलपथी विजय, ऐश्वर्या लक्ष्मी आणि इतर अनेकांनी हजेरी लावली होती.