KGF 2 Box Office Collection : खान-बिन विसरा सगळे, केजीएफचा ‘यश’ सगळ्यांवर भारी, फास्टेस्ट 200 कोटींची कमाई
'केजीएफ: चाप्टर 2' (KGF 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवलं आहे. अवघ्या पाच दिवसांत हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणार आहे. कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत 193.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवलं आहे. अवघ्या पाच दिवसांत हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणार आहे. कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत 193.99 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सोमवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी ‘केजीएफ 2’ हा 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. प्रशांत नील (Prashanth Neel) दिग्दर्शित या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ला मागे टाकलं आहे. ‘बाहुबली 2’ने सहाव्या दिवशी 200 कोटींचा टप्पा पार केला होता. केजीएफ 2 हा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचत असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने म्हटलं आहे.
केजीएफ 2 (हिंदी) ची आतापर्यंतची कमाई-
गुरुवार- 53.95 कोटी रुपये शुक्रवार- 46.79 कोटी रुपये शनिवार- 42.90 कोटी रुपये रविवार- 50.35 कोटी रुपये एकूण- 193.99 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-
R#KGF2 CREATES HISTORY AGAIN… FASTEST TO ENTER ₹ 200 CR CLUB… ⭐ #KGFChapter2: Will cross ₹ 200 cr today [Mon, Day 5] ⭐ #Baahubali2: Day 6#KGF2 is REWRITING RECORD BOOKS… Thu 53.95 cr, Fri 46.79 cr, Sat 42.90 cr, Sun 50.35 cr. Total: ₹ 193.99 cr. #India biz. #Hindi. pic.twitter.com/ysKnW2zIuV
— taran adarsh (@taran_adarsh) April 18, 2022
केजीएफ 2 हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या पाच भाषांमधील आतापर्यंतची कमाई ही 551.83 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडमध्ये हा चित्रपट जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘फँटास्टिक बीस्ट 3’ या यादीत पहिल्या क्रमांकावर आणि ‘सॉनिक द हेडहॉग 2’ हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवर 15 ते 17 एप्रिल या वीकेंडमध्ये जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांची यादी शेअर केली आहे. या दहा चित्रपटांमध्ये केजीएफ 2 हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांचं ट्विट-
Here is @Comscore Global Top 10 Movies for the Apr 15th to 17th Weekend..#KGFChapter2 is at No.2.. https://t.co/XsG1gVLe7G
— Ramesh Bala (@rameshlaus) April 18, 2022
केजीएफ 2 ची जगभरातील कमाई-
गुरुवार- 165.37 कोटी रुपये शुक्रवार- 139.25 कोटी रुपये शनिवार- 115.08 कोटी रुपये रविवार- 132.13 कोटी रुपये एकूण- 551.83 कोटी रुपये
‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटाच्या अखेरीस ‘केजीएफ: चाप्टर 3’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दाखवलंय. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश, जॉन कोकेन आणि सरन यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा:
Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाने जिंकलं सुवर्णपदक; ‘डेन्मार्क ओपन’मध्ये अभूतपूर्व कामगिरी
Yash: कंगना रनौत KGF 2 स्टार यशच्या प्रेमात; चित्रपट पाहिल्यावर म्हणाली..