‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!
सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या या चित्रपटाची क्रेझ सोशल मीडियावर आणि सर्वसामान्यांमध्येही पहायला मिळतेय. ज्यांनी हा चित्रपट पाहिलाय, त्यांना यशचा (Yash) हा डायलॉग माहितच असेल.
व्हायलेन्स, व्हायलेन्स, व्हायलेन्स (हिंसा).. मला ते आवडत नाही. मी ते टाळतो. पण हिंसेला मी आवडतो आणि मी ते टाळू शकत नाही.. ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF: Chapter 2) या चित्रपटातील रॉकीच्या (Rocky) तोंडी असलेला हा डायलॉग चांगलाच गाजलाय. सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या या चित्रपटाची क्रेझ सोशल मीडियावर आणि सर्वसामान्यांमध्येही पहायला मिळतेय. ज्यांनी हा चित्रपट पाहिलाय, त्यांना यशचा (Yash) हा डायलॉग माहितच असेल. मात्र ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, त्यांच्यासाठी हा डायलॉग आता भन्नाट अंदाजात सोशल मीडियावर समोर आला आहे. कर्नाटकातील एका व्यक्तीने त्याच्या लग्नपत्रिकेत आपल्याच खास शैलीत हा डायलॉग लिहिला आहे. लग्नपत्रिकेतील या ओळी वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायलेन्सच्या जागी या लग्नपत्रिकेत ‘लग्न’ असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘लग्न, लग्न, लग्न.. ते मला आवडत नाही, मी ते टाळण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडतं, म्हणूनच ते मी टाळू शकत नाही,’ अशा मजेशीर अंदाजात हा डायलॉग लग्नपत्रिकेवर छापण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या या लग्नपत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पहा लग्नपत्रिका-
This is how am gonna print my wedding card ?#KGFChpater2 pic.twitter.com/TQE7BcOaMG
— YOGITHA ✨ (@MISS_BINGG) April 19, 2022
‘केजीएफ: चाप्टर 2’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने अवघ्या सात दिवसांत कमाईचा 250 कोटींचा टप्पा पार केला आहे. 255.05 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘बाहुबली 2’, ‘दंगल’, ‘संजू’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचा विक्रम KGF 2ने मोडला आहे. बाहुबली 2ने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी तर दंगल, संजू आणि टायगर जिंदा है या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी 250 कोटींचा टप्पा पार केला होता.
KGF 2 (हिंदी) ची आतापर्यंती कमाई-
गुरुवार- 53.95 कोटी रुपये शुक्रवार- 46.79 कोटी रुपये शनिवार- 42.90 कोटी रुपये रविवार- 50.35 कोटी रुपये सोमवार- 25.57 कोटी रुपये मंगळवार- 19.14 कोटी रुपये बुधवार- 16.35 कोटी रुपये एकूण- 255.05 कोटी रुपये
हेही वाचा:
Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम