KGF 3 मध्ये काय पाहायला मिळणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला ; दिग्दर्शकाने दिली सर्वात मोठी हिंट
KGF सिनेमाने प्रेक्षकांचं इतकं मनोरंजन केलं की लोकं आता त्याच्या पुढच्या भागाची वाट पाहू लागले आहेत. केजीएफ सिनेमाचा तिसरा भाग लवकरच येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मुंबई : गुन्हेगारीच्या दुनियेतला तो गुंड, ज्याच्या जिद्दीपुढे ‘राक्षस’ हा शब्दही कमी पडतो. तो म्हणजे राजा कृष्णप्पा बेरिया… उर्फ रॉकी. रॉकीने आपल्या आईला वचन दिले होते, ‘एक दिवस मी तुला जगातील सर्व सोने आणून देईल.’ ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. KGF Chapter 2 मध्ये, रॉकीला सोन्याने भरलेले जहाजासह समुद्रात बुडताना पाहिलं, पण हा सामान्य माणूस नसून स्वतः एक वादळ आहे. 14 एप्रिल 2023 रोजी, ‘KGF: Chapter 2’ च्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झाले आहे. निर्मात्यांनी KGF 3 ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांना संकेत दिले आहेत.
KGF 2 च्या पोस्ट क्रेडिट सीनने संकेत दिले की, प्रशांत नील KGF 3 साठी तयारी करत आहे. पण क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून प्रेक्षकांना काय वाटतंय. चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्यांनी 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये असे संकेत दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण कथेचा उलथापालथ होणार आहे.
KGF: Chapter 3 ची कथा काय?
निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. जर तुम्ही KGF 2 काळजीपूर्वक पाहिला असेल, तर तुम्हाला तो क्षण आठवेल जेव्हा काळ्या पडद्यावर 1978 ते 1981 पर्यंत स्क्रीन अचानक गायब झाली. त्यानंतर रॉकी त्याच्या राज्याकडे, कोलार गोल्ड फील्ड्सकडे सरळ पाहताना एका मोठ्या बाटलीतून वाइन पीत असताना आपण पाहतो. या चार वर्षांत रॉकीने काय केले, हा प्रश्न आहे. KGF: Chapter 3 ची कथा या चार वर्षांच्या आसपास विणली जाईल असे निर्मात्यांनी सूचित केले आहे.
The most powerful promise kept by the most powerful man ?
KGF 2 took us on an epic journey with unforgettable characters and action. A global celebration of cinema, breaking records, and winning hearts. Here’s to another year of great storytelling! #KGFChapter2#Yash… pic.twitter.com/iykI7cLOZZ
— Hombale Films (@hombalefilms) April 14, 2023
KGF-3 मध्ये रॉकी आणि रमिका सेन यांची टक्कर
इतकंच नाही तर या दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, या कथेत पुढे काय घडणार आहे ते टक्कर आणि विध्वंसाचे आतापर्यंतचे सर्वात भयानक दृश्य असेल. रॉकीची क्रेझ आपण पाहिली आहे. रॉकीच्या डेथ वॉरंटवर स्वाक्षरी करणाऱ्या रमिका सेन म्हणजेच रवीना टंडनच्या पात्राचा जिद्दही आपण पाहिला आहे. मात्र आजपर्यंत या दोघांची टक्कर आपण पाहिली नाही. म्हणजेच KGF च्या कथेत खरच खूप काही शिल्लक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील सध्या यावर काही सांगत नसले तरी KGF: Chapter 3 थिएटरमध्ये एक नवीन वावटळ आणणार आहे.
KGF-3 चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होणार
काही रिपोर्ट्सनुसार KGF 3 चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल असं म्हटलं जात आहे. यशचा हा 19 वा चित्रपट असेल. 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेल्या ‘KGF: Chapter 2’ ने बॉक्स ऑफिसवर खरोखरच तुफान आणले. 168 मिनिटांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना इतके मंत्रमुग्ध केले की जगभरात चित्रपटाने 1250 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. रॉकीचा वेडेपणा आपण पाहिला आहे, तो एका सोन्याच्या बिस्किटासाठी संपूर्ण पोलीस स्टेशनवर हल्ला करतो. अशा स्थितीत त्याच्या क्रेझचा अंदाज बांधता येतो की तो आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तो काय करु शकतो.