KGF: केजीएफ फेम अभिनेता बी. एस. अविनाशचा अपघात; ट्रकने त्यांच्या गाडीला दिली धडक
बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास अविनाश हे अनिल कुंबळे सर्कलजवळ प्रवास करत होते. त्याच वेळी एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कुबन पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘केजीएफ: चाप्टर 1’ आणि ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF actor) या दोन्ही सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला अभिनेता बी. एस. अविनाश (BS Avinash) याचा बुधवारी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) अपघात झाला. अविनाशच्या मर्सिडीज बेंज या गाडीची एका ट्रकला धडक लागली आणि हा अपघात झाला. सुदैवाने यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास अविनाश हे अनिल कुंबळे सर्कलजवळ प्रवास करत होते. त्याच वेळी एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कुबन पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अविनाश यांच्या गाडीला धडक लागल्याचं दिसताच आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली.
यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ’ चित्रपटात अविनाशने अँड्र्यूची भूमिका साकारली होती. स्थानिक गुंडांचा तो बॉस असतो. केजीएफ 2च्या तुलनेत पहिल्या भागात त्याच्या भूमिकेला अधिक वाव होता. दिवंगत अभिनेते चिरंजीवी सर्जा यांच्यामुळे अविनाशला केजीएफ चित्रपटाची ऑफर मिळाली होती. चिरंजीवी यांच्या एका मित्राच्या संपर्कातून अविनाशची केजीएफचे सिनेमॅटोग्राफर भुवन गोवडा यांच्याशी भेट झाली. नंतर भुवनने दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याशी त्याची भेट घडवून दिली.
अपघातानंतर बी. एस. अविनाश यांची पोस्ट-
View this post on Instagram
केजीएफ: चाप्टर 1 साठी 2015 पासून तयारी केल्याचं अविनाशने एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर त्याला इतर अनेक ऑफर्स येऊ लागले. केजीएफ: चाप्टर २ ला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालं. यामध्ये संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली. दुसऱ्या भागात रॉकी भाई हा सोन्याच्या खाणींवर आपलं वर्चस्व गाजवतो. यामध्ये रवीना टंडनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1200 कोटींची कमाई केली. लवकरच केजीएफ सीरिजचा तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.