KGF Chapter 2: अवघ्या तीन दिवसांत 150 कोटींकडे वाटचाल; वीकेंड कमाईचाही विक्रम मोडणार
'केजीएफ: चाप्टर 2' (KGF Chapter 2) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही कमाल केली आहे.
‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF Chapter 2) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही कमाल केली आहे. यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 150 कोटींकडे वाटचाल केली आहे. चित्रपटाला मोठा वीकेंड मिळाल्याने बॉक्स ऑफिस कमाईवर त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. केजीएफ: चाप्टर 2 हिंदी व्हर्जनने तीन दिवसांत 143.64 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रविवारी या कमाईत आणखी वाढ होऊन प्रदर्शनाच्या दिवसाचा आकडासुद्धा पार करेल अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (KGF Chapter 2 Box Office Collection)
केजीएफ: चाप्टर 2 हिंदी व्हर्जनची कमाई-
गुरुवार- 53.95 कोटी रुपये शुक्रवार- 46.79 कोटी रुपये शनिवारी- 42.90 कोटी रुपये एकूण- 143.64 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट
#KGF2 [#Hindi] is all set for a RECORD-SMASHING weekend… Day 3 is SUPER-SOLID – metros ROCKING, mass circuits STRONG… Day 4 [Sun] will be competing with Day 1 [Thu]… This one’s a #BO MONSTER… Thu 53.95 cr, Fri 46.79 cr, Sat 42.90 cr. Total: ₹ 143.64 cr. #India biz. pic.twitter.com/Dy1XPOqtQn
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2022
या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही आपली छाप सोडली आहे. युएसएमध्ये केजीएफ 2ने तीस लाख डॉलर्सची कमाई केल्याची माहिती, चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिली आहे. केजीएफ- चाप्टर 2 चं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. केजीएफवर ताबा मिळवलेल्या रॉकीची कथा या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. दुसऱ्या भागाच्या अखेरीस केजीएफ: चाप्टर 3 सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश, जॉन कोकेन यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा:
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरील एक दिवस; ‘अनिरुद्ध’ला का आवडतं काल्पनिक विश्व?
Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाची चमकदार कामगिरी; भारतासाठी जिंकलं रौप्यपदक