‘खडमोड’ चित्रपट या दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित, अखेर…

खडमोड हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय. हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळतंय. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

'खडमोड' चित्रपट या दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित, अखेर...
Khadmod
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 5:40 PM

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध विषयांवरील तसेच लक्ष वेधून घेणारे शीर्षक असलेले चित्रपट बनवले जातात. असाच एक चित्रपट खडमोड हा लवकरच आपल्या भेटीला येतोय. हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळतंय. खडमोड या उत्कंठावर्धक शीर्षकामुळे यात नेमके काय पाहायला मिळेल याचे कुतूहल चाहत्यांमध्ये नक्कीच बघायला मिळतंय. खडमोड हा शब्द प्रामुख्याने नंदूरबार भागातील आहे. याचा अर्थ आता सर्व गोष्टी विनाशाकडे चालल्या आहेत, असा होतो.  मानवाने जंगलतोड करून अतिक्रमण केले आहे, ज्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

भविष्यात हे सावट आणखी गडद होणार असल्याचे संकेतच या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.  जंगलतोडीचा परिणाम वाईल्ड लाईफवर होत आहे. पूर्वीच्या तुलनेत जंगले कमी झाल्याने जंगलातील जनावरे गाव तसेच शहरांकडे वळत आहेत. एखाद्या काॅलनीत किंवा घरात बिबट्या शिरल्याच्या बातम्या आपल्या कानावर नेहमीच येताना दिसतात.

आपण त्यांच्या घरावर अतिक्रमण करत असल्याने त्यांच्याकडे काहीच पर्याय नाही हा चित्रपटाचा बेसिक थॅाट असून हाच मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘खडमोड’ करणार आहे. एका मुलाच्या माध्यमातून खडमोड चित्रपटाची गोष्ट उलगडत जाणार आहे. नंदूरबारमधील कोकणा आदिवासी समाजातील ही कथा आहे. या समाजातील एका तरुणाचा बैल हरवतो.

बैल शोधण्यासाठी तो जंगलात जातो आणि तो देखील हरवतो. त्यानंतर त्याला बाहेर पडण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. यादरम्यान जे घडते ते पडद्यावर पाहायला मिळेल. आज जंगली जनावरे शहरे आणि गावांमध्ये का येत आहेत? हा आज सर्वांना पडलेला प्रश्न चित्रपटातील एक कॅरेक्टर विचारते. या प्रश्नाचे उत्तर खडमोड चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. हा संपूर्ण चित्रपट नंदूरबारमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.

मेघराज मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एस्थेट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली खडमोड चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन, पटकथा आणि लेखन राहुल रामचंद्र पवार यांनी केले आहे. संकलन धनेश गोपाळ यांनी केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेतील मेघराज मल्लीनाथ यांच्यासोबत शुभम पवार, अनिल खोपकर, कमलेश अहिरे, तेजस गांगुर्डे, पूजा डोळस, संभाजी जगताप आदी कलाकार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.