‘खतरो के खिलाडी 13’च्या निर्मात्यांना एक चुक महागात पडण्याची शक्यता, थेट शो बॉयकॉट करण्याची मागणी, धक्कादायक प्रकार पुढे
खतरो के खिलाडी 13 हा शो धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे खतरो के खिलाडी 13 या शोची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. खतरो के खिलाडी 13 टीआरपीमध्येही धमाल करत आहे. मात्र, आता शो मोठ्या अडचणीमध्ये सापडल्याचे बघायला मिळतंय.
मुंबई : रोहित शेट्टी याचा शो खतरो के खिलाडी 13 (Khatron Ke Khiladi 13) सध्या तूफान चर्चेत आहे. खतरो के खिलाडी 13 मध्ये टीव्ही मालिकांमध्ये अनेक मोठे चेहरे सहभागी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शोचे शूटिंग विदेशात झाले. सध्या शोचे एपिसोड (Episode) टीव्हीवर दाखवणे सुरू आहे. खतरो के खिलाडी 13 कायमच चर्चेत असते. बऱ्याच वेळा खतरो के खिलाडी 13 मध्ये स्टंट करत असताना अनेकांना मोठी दुखापत झाल्याच्या घटना या घडल्या आहेत. खतरो के खिलाडी 13 मध्ये स्पर्धेक हे धमाका करताना दिसले.
खतरो के खिलाडी 13 मध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम हे बिग बाॅसनंतर लगेच सहभागी झाले. गुम है किसी के प्यार में या मालिकेत पत्रलेखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात ऐश्वर्या शर्मा ही देखील खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाली. ऐश्वर्या शर्मा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
नेहमीच खतरो के खिलाडी हा शो वादात सापडताना देखील दिसतो. अनेकदा खतरो के खिलाडीवर शो स्क्रीप्टेड असल्याचा आरोप देखील लावण्यात आलाय. मात्र, यावेळी शोवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलाय. सोशल मीडियावर खतरो के खिलाडीच्या निर्मात्यांच्या विरोधात वातावरण हे बघायला मिळतंय. लोक संताप व्यक्त करत आहेत.
लोकांच्या म्हणणे आहे की, खतरो के खिलाडी 13 चे निर्माता हे ऐश्वर्या शर्मा हिला परत परत वाचवताना दिसत आहेत. ऐश्वर्या शर्मा हिला खतरो के खिलाडी 13 च्या निर्मात्यांना बाहेरच काढायचे नाहीये. खतरो के खिलाडी 13 चे निर्माता ऐश्वर्या शर्मा हिला वाचवत आहेत. लोक सोशल मीडियावर कमेंट करत आपली भडास काढताना दिसत आहेत. अनेकांनी शो बायकाॅट करण्याची मागणीही केली.
ऐश्वर्या शर्मा हिला सोप्पे स्टंट करण्यासाठी देत असल्याचा आरोपही केला जात आहे. काहीही स्टंट न करताना अजूनही ऐश्वर्या शर्मा ही खतरो के खिलाडी 13 मध्ये आहे. सध्या खतरो के खिलाडी 13 मध्ये अब्दू रोजिक आल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अब्दू रोजिक हा धमाकेदार स्टंट करताना देखील दिसत आहे. शिव ठाकरेही शोमध्ये दिसत आहे. खतरो के खिलाडी 13 नंतर लगेचच ऐश्वर्या शर्मा ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
फक्त ऐश्वर्या शर्मा हिच नाही तर मालिकेत विराट चव्हाणची भूमिका साकारणारा अभिनेता नील भट्ट हा देखील बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांची पहिली भेट ही गुम है किसी के प्यार में या मालिकेच्या सेटवरच झाली. त्यानंतर हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि यांनी अगोदर साखरपुडा केला आणि लग्न केले.