“सुशांत सिंह राजपूतसारखी होऊ शकते माझी अवस्था”; अभिनेत्याने व्यक्त केली भिती

"त्याला माझं करिअर उद्ध्वस्त करायचंय"; इन्स्टा Live मध्ये अभिनेत्याचे गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूतसारखी होऊ शकते माझी अवस्था; अभिनेत्याने व्यक्त केली भिती
खेसारी लाल यादव, सुशांत सिंह राजपूतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 2:56 PM

मुंबई: बॉलिवूडप्रमाणेच सध्या भोजपुरी इंडस्ट्रीही बरीच चर्चेत असते. मोठ्या कलाकारांमधील संघर्ष ही कोणत्याच इंडस्ट्रीसाठी नवीन गोष्ट नाही. भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत, जे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या भोजपुरी सलमान खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. खेसारीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने नाव न घेता पवन सिंहवर आरोप केले आहेत.

खेसारी लालने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलंय की तो इंडस्ट्रीतील एका व्यक्तीच्या निशाण्यावर आहे आणि बरेच लोक त्याची साथ देत आहेत. माझी अवस्था सुशांत सिंह राजपूतसारखी होऊ शकते, असंही धक्कादायक वक्तव्य त्याने या व्हिडीओत केलं आहे.

हे सुद्धा वाचा

युट्यूबवरून डिलिट झाली खेसारीची गाणी

खेसारी लालने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत आपलं दु:ख चाहत्यांना सांगितलं. “मी शून्यातून माझ्या करिअरची सुरुवात केली होती, त्यामुळे मला यशाची किंमत माहीत आहे. जसं सुशांत सिंह राजपूतला सर्वांनी मिळून त्रास दिला होता आणि बॉलिवूडमधील काही लोक त्याला बॉयकॉट करत होते. तसाच मलाही त्रास दिला जातोय”, असं तो म्हणाला.

यापुढे तो म्हणतो, “माझीही अवस्था सुशांतसारखी केली जातेय. एका व्यक्तीने युट्यूबवरील माझी गाणी डिलिट केली आहेत आणि मला सतत त्रास देतोय. त्याला माझं करिअर संपवायचं आहे.” गेल्या काही दिवसांत खेसारी लाल यादवची बरीच गाणी युट्यूबवरून अचानक डिलिट झाली आहेत.

या इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे त्याने नाव न घेता पवन सिंहवर निशाणा साधला आहे. ‘मोठ्या भावासोबत संपूर्ण इंडस्ट्री का असेना, पण हा खेसारी घाबरणारा नाही’, असं त्याने स्पष्ट केलं.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....