Debut | जाह्नवी नंतर खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, बोनी कपूर म्हणाले…

श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूरची (Boney Kapoor) मोठी मुलगी जाह्नवी कपूरने (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तिच्या जबरदस्त अभिनयामुळे तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Debut | जाह्नवी नंतर खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, बोनी कपूर म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 10:15 AM

मुंबई : श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूरची (Boney Kapoor) मोठी मुलगी जाह्नवी कपूरने (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तिच्या जबरदस्त अभिनयामुळे तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि सध्या जाह्नवीच्या हातात बरेच चित्रपट आहेत. आता जाह्नवीनंतर तिची छोटी बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. खुशीची फॅन फॉलोइंगही एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक खुशीली फाॅलो करतात. आता खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे खुद्द बोनी कपूर यांनी सांगितले आहे. (Khushi Kapoor will make an entry in Bollywood)

बॉम्बे टाईम्सशी बोलत असताना जेव्हा बोनी कपूर यांना खुशीच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण विषयी विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, हो खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून आपल्याला लवकरच तिच्या चित्रपटाबद्दल ऐकायला मिळेल. पण त्यावेळी बोनी कपूर यांना हेही स्पष्ट केले की, त्यांचे प्रॉडक्शन हाऊस खुशीली लाँच करणार नाही. जाह्नवी आणि अर्जुन कपूर देखील बोनी कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले नव्हते. निर्माता बोनी कपूर यांनाही आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. ते अनिल कपूरच्या AK Vs AK मध्ये दिसले होते आणि आता रणबीर श्रद्धा कपूरच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत.

जाह्नवी कपूर आणि कार्तिक आर्यन नवीन वर्षाचे स्वागत त्यांनी गोव्यात केले होते. गोव्याचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यामुळे आता जाह्नवी आणि कार्तिकच्या अफेयर्सच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे. मात्र, अद्यापपर्यंत जाह्नवी आणि कार्तिकने त्यांच्या नात्या संदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. गोव्यातील एका फोटोमध्ये जाह्नवी आणि कार्तिकने एक सारख्याच रंगाचे ड्रेस घातले होते, त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला देखील आहे या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

संबंधित बातम्या :

सपना चौधरीच्या चंद्रवाल गाण्याचा इंटरनेवर धुमाकूळ, तुम्ही पाहिलं का, पाहिलं नसेल तर पाहाच…!

Shocking | दिवस रात्र कामाने आलिया टेन्शनमध्ये, केलं हॉस्पिटलमध्ये दाखल!

Bhool Bhulaiyaa 2 | भूल भुलैया 2 मधून तब्बूची एक्झिट? वाचा नेमकं काय घडलं

(Khushi Kapoor will make an entry in Bollywood)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.