Kiara Advani हिच्या मावशीच्या प्रेमात होता सलमान खान, पण का तुटलं दोघांचं नातं?

किआरा अडवाणी हिची मावशी होती सलमान खान याचं पहिलं प्रेम, कोण आहे अभिनेत्रीची मावशी, का संपलं भाईजान याच्यासोबत असणारं नातं?

Kiara Advani हिच्या मावशीच्या प्रेमात होता सलमान खान, पण का तुटलं दोघांचं नातं?
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 11:39 AM

मुंबई : आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. कॉलेजमध्ये असताना झालेलं ते पहिलं प्रेम काही जणांचं पूर्ण होतं, तर काहींची प्रेम कहाणी अधुरी राहते. अभिनेता सलमान खान याच्या आयुष्यात देखील असंच काही झालं आहे. अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं, पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलनी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ… अशा अनेक अभिनेत्रींसोबत सलमान याच्या नावाची चर्चा झाली. पण भाईजानचं लग्न होवू शकलं नाही. या अभिनेत्रींपैकी एकही अभिनेत्री सलमानचं पहिलं प्रेम नव्हती, तर सलमान खान यांची पहिली गर्लफ्रेंड कोण होती? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. रिपोर्टनुसार, बॉलिवूडच्या सुपरस्टारची पहिली गर्लफ्रेंड दिग्गज अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री किआरा आडवाणी (Kiara Advani) हिची मावशी शाहीन जाफरी (Shaheen Jaffrey) होती.

सलमान खान वयाच्या १९ व्या वर्षी शाहीन जाफरी हिच्यावर प्रचंड प्रेम करत होता. एवढंच नाही तर, अभिनेत्याने शाहीन जाफरी हिची ओळख कुटुंबासोबत देखील करुन दिली होती. शाहीन जाफरी हिची वाट बघत सलमान खान तासंतास कॉलेज बाहेर उभा रहायचा. तेव्हा सलमान खान याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नव्हतं. शिवाय तेव्हा सलमान फक्त १९ वर्षांचा होता.

शाहीन जाफरी आणि सलमान खान सेकंड ईयरचे विद्यार्थी होते. तेव्हाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्ण पणे बुडाले होते. रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या कुटुंबीयांनाही शाहीन खूप आवडू लागली होती, त्यांना शाहीन हिला खान कुटुंबाची सून बनवायची होती, पण अचानक असं घडलं ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती.

हे सुद्धा वाचा

रिपोर्ट्सनुसार, हीच वेळ होती जेव्हा संगीता बिजलानी सलमान खान आणि शाहीनच्या आयुष्यात आली. आयुष्यात संगीता हिची एन्ट्री झाल्यामुळे शाहीन हिच्यासोबत असलेलं सलमान खान यांचं नातं संपलं. त्यानंतर शाहीन आणि सलमान खान यांचं ब्रेकअप झालं. संगीता जेव्हा सलमान खान याला भेटली, तेव्हा तिचं देखील बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत ब्रेकअप झालं होतं.

सलमान आणि संगीता यांची ओळख एका हेल्थ सेंटरमध्ये झाली होती. ओळख झाल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत होत्या. भेटींच रुपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मेत्रीचं प्रेमात. पण सलमान आणि संगीता यांचं नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. संगीताला १० वर्ष डेट केल्यानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अली हिची एन्ट्री झाली आणि संगीतोसोबत भाईजानचं ब्रेकअप झालं.

सलमान याच्यापासून विभक्त झाल्यानंतर संगीता बिजलानी हिने माजी  क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. आता अनेक वर्षांनंतर सलमान खान याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये संगीता उपस्थित असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.