किआरा अडवाणी हिच्याकडून Sushant Singh Rajput च्या ‘त्या’ सवयीचा मोठा खुलासा
सुशांत सिंह राजपूत याच्या एका सवयीबद्दल किआरा अडवाणीकडून मोठा खुलासा; निधनानंतर देखील अभिनेता 'या' गोष्टीमुळे चर्चेत

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने १४ जून २०२० मध्ये वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. अभिनेत्याच्या आत्महत्येला जवळपास दोन वर्ष पूर्णे झाली आहेत. पण आजही अभिनेत्याच्या आठवणी कुटुंब आणि चाहत्यांच्या मनात कायम आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत सुशांतचे चांगले संबध होते. त्यामुळे आजही अभिनेत्याच्या आठवणी फक्त चाहत्यांच्याच नाही तर, सेलिब्रिटींच्या मनात देखील कायम आहेत. सुशांतच्या अशा काही सवयी होत्या ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.
सुशांत सिंह राजपूत फक्त दोन तास झोपायचा. सुशांतबद्दल हा मोठा खुलासा अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) हिने ‘एमएस धोनी: द स्टोरी अनटोल्ड’ सिनेमा प्रदर्शनादरम्यान केला होता. सुशांतला इनसोमिन्या (Insomnia)चा त्रास होत असल्याचा खुलासा किआरा हिने केला होता.
‘सुशांत कधी सेटवर थकत नव्हता. त्याने मला सांगितलं होतं मानवी शरीराला फक्त दोन तास झोपेची गरज असते. याच गोष्टीचं पालन करत सुशांत कायम सेटवर आनंदी आणि फ्रेश असायचा.’ सुशांतच्या सवयीबद्दल किआराने मुलाखतीत सांगितलं. सध्या किआरा सर्वत चर्चेत आहे.
सुशांतबद्दल किआरा पुढे म्हणाली, ‘त्याला निद्रानाशाचा त्रास होता. मानवी शरीराला फक्त दोन तास झोपेची गरज असते. तरी देखील आपण सात ते आठ तास झोपतो.’ सुशांत आज आपल्यात नसला तरी अभिनेत्या आठवणी मात्र अनेकांच्या मनात घर करुन राहिल्या आहेत.
दोन वर्षांनंतर देखील सुशांतची आत्महत्या होती की हत्य हे सत्य उलगडू शकलं नाही. सीबीआय तपासानंतर देखील अभिनेत्याच्या निधनाबद्दल कोणतंही सत्य समोर आलं नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहते, कुटुंबासह बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला. आज ही सुशांत सिंह राजपूत चाहत्यांच्या मनात कायम आहे.