Alia Bhatt मुळे ‘या’ अभिनेत्रीला बदलावं लागलं नाव; आज बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री

फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीच्या आयुष्यात आलिया भट्टमुळे झाले मोठे बदल... आज तिच आहे बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री... कोण आहे ती, तुम्ही ओळखळं का?

Alia Bhatt मुळे 'या' अभिनेत्रीला बदलावं लागलं नाव; आज बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 1:36 PM

मुंबई | बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आज इंडस्ट्रीमधील अव्वल अभिनेत्रींना देखील अभिनयाच्या प्रवासात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. आज त्याच अभिनेत्री बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. आता देखील एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीला कदाचित तुम्ही ओळखलं नसेल. पण इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याआधी या अभिनेत्रीला स्वतःचं नाव देखील बदलावं लागलं. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यामुळे फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीला बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर स्वतःचं नाव बदलावं लागलं.

फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘शेरशाह’ फेम किआरा आडवाणी आहे. किआरा आडवाणी हिचं खरं नाव आलिया आडवाणी आहे. पण कियाराला नाव बदलण्याचा सल्ला अभिनेता सलमान खान याने दिला होता. बॉलिवूडमध्ये एक आलिया यशाच्या शिखरावर असताना दुसरी आलिया नको.. असा सल्ला भाईजानने किआरा हिला दिला.

किआरा हिला सल्ला देणाऱ्या सलमान खान याने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी स्वतःचं नानव बदललं आहे. सलमान खानचं खरं नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान असं आहे. सलमान खान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सलमान खान याने दिलेल्या सल्ल्यानंतर किआराला नवी ओळख मिळालीय.

किआर आज बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. किआराने २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याआधी किआराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फुगली’ सिनेमात देखील अभिनय करत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अभनेत्री किआरा आडवाणी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ‘शेहशाह’ सिनेमानंतर किआराच्या लोतप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्री आणि किआरा यांच्यात प्रेम फुललं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.

लग्नाआधी सिद्धार्थ आणि किआरा यांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं. लग्नानंतर फोटो पोस्ट करत सिद्धार्थ आणि किआरा यांनी विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली. लग्नानंतर सिद्धार्थ आणि किआरा अनेक ठिकाणी एकत्र दिसले. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील दोघे एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम  सक्रिय असते. सोशल मीडियावर किआराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी किआरा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.