Kiara Advani | लग्नानंतर किआरा अडवाणी हिने स्वयंपाकच केलेला नाही; म्हणाली, ‘मी फक्त पाणी…’

Kiara Advani | सिद्धार्ध मल्होत्रा याच्यासाठी किआरा अडवाणी हिने एकही पदार्थ बनवलेला नाही.. लग्नानंतर जगत असलेल्या आयुष्यावर अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या सर्वत्र किआरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा

Kiara Advani | लग्नानंतर किआरा अडवाणी हिने स्वयंपाकच केलेला नाही; म्हणाली, 'मी फक्त पाणी...'
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 9:32 AM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. किआरा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्रीला ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशाह’ सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर किआरा हिने कधीही मागे वळून पाहीलं नाही. पण किआरा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील तुफान चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बॉर्डरवर लढत असलेल्या सैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्रीने सैनिकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ज्यामुळे किआरा तुफान चर्चेत आली आहे.

कार्यक्रमा दरम्यान एका सैनिकाने अभिनेत्री, ‘लग्नानंतर सिद्धार्थ याच्यासाठी कोणता पदार्थ बनवला होता?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देत किआरा म्हणाली, ‘मी लग्नानंतर कोणताही पदार्थ बनवलेला नाही. फक्त पाणी गरम केलं असेल..’ एवढंच नाही तर ‘मी फार भाग्यशाली आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

‘मी फार भाग्यशाली आहे, कारण माझा जो पती आहे, त्याला स्वयंपाक करायला फार आवडतं. म्हणून तो स्वतःसाठी नवीन पदार्थ बनवत असतो… मी त्यातलं खाते…’ असं म्हणते किआरा हिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील एक सत्य चाहत्यांना सांगितलं. अभिनेत्रीने सिद्धार्थ याला आवडत असलेल्या पदार्थाचं नाव देखील सांगितलं आहे.

सिद्धार्थच्या आवडत्या पदार्थाबाबत किआरा म्हणाली, ‘तो खरोखर खूप छान ब्रेड बनवतो. ब्रेज बनवणं फार अवघड आहे पण तो छान ब्रेड बनवतो…’ सध्या सर्वत्र किआरा अडवाणी हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे. किआरा कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. चाहत्यांना देखील दोघांची जोडी फार आवडते. दोघे कायम सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात. (kiara advani independence day special)

किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. पण लग्नानंतर फोटो पोस्ट करत दोघांनी पती – पत्नीच्या नात्याची घोषणा केली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला..

पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली. (kiara advani and sidharth malhotra relationship)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.