हुबेहूब कियारा अडवाणीच; पाहून सिद्धार्थ मल्होत्राही होईल थक्क!

हुबेहूब बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसारखी दिसणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. कियारासारख्या दिसणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल!

हुबेहूब कियारा अडवाणीच; पाहून सिद्धार्थ मल्होत्राही होईल थक्क!
कियारा अडवाणीची हुबेहूब कॉपीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 1:41 PM

मुंबई : 19 मार्च 2024 | बॉलिवूडमधल्या एखाद्या सेलिब्रिटीसारखं हुबेहूब दिसणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आजवर कतरिना कैफ, ऐश्वर्या राय, अजय देवगण, हृतिक रोशन, सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यासारखे हुबेहुब दिसणाऱ्यांचे व्हिडीओ किंवा फोटो तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कियारा अडवाणीसारखी दिसणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘जणू कियाराची जुळी बहीणच’ अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि बोलण्याची पद्धतसुद्धा कियारासारखीच आहे.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘मिशोवरून ऑर्डर केलेली कियारा’, असं एकाने लिहिलं. तर ‘कियारा अडवाणी 2.0’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘खात्या-पित्या घरातली कियारा’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलंय. ‘हिचा व्हिडीओ पाहून सिद्धार्थ मल्होत्रासुद्धा चकीत होईल’, असंही काहींनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

कियारासारखी दिसणारी ही तरुणी कोण?

हुबेहूब कियारा अडवाणीसारखी दिसणाऱ्या या तरुणीचं नाव काजल सिंह आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 65 हजार फॉलोअर्स आहेत. काजल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. स्वत:चे विविध व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. याआधी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी हिचीही तुलना कियाराशी झाली होती. तनिषा ही हुबेहूब अभिनेत्री कियारा अडवाणीसारखी दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं.

कियाराने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. मात्र 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर 2018 मध्ये ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी चित्रपटात तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकेची तुफान चर्चा झाली. शाहिद कपूरसोबतच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. कियाराने पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ या चित्रपटात काम केलंय.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.