‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये कियाराचा फेक ॲक्सेंट ऐकून भडकले नेटकरी; म्हणाले..

फ्रान्समध्ये पार पडलेल्या या 'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या निमित्ताने शनिवारी रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि व्हॅनिटी फेअर युरोपच्या डिनरमध्ये सहभागी झालेल्या सहा मान्यवरांमध्ये कियाराचाही समावेश होता.

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये कियाराचा फेक ॲक्सेंट ऐकून भडकले नेटकरी; म्हणाले..
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिची बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी बरोबर घट्ट मैत्री आहे. दोघी बैल मैत्रिणी आहेत. त्या एकाच शाळेत होत्या.
Image Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2024 | 4:11 PM

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर कोणत्या अभिनेत्रीचा कोणता लूक आहे, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं जातं. यंदा अभिनेत्री कियारा अडवाणीसुद्धा या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. रेड कार्पेटवर तिचा खास लूक पहायला मिळाला. यावेळी तिने गुलाबी आणि काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. यानंतर ती फेस्टिव्हलच्या ‘गाला डिनर’मध्येही सहभागी झाली होती. यावेळी माध्यमांसमोर तिने मुलाखत दिली. कियाराच्या या मुलाखतीचा व्हिडीओसुद्ध सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय.

या व्हिडीओत कियारा म्हणाली, “अभिनयक्षेत्रात माझ्या करिअरला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणं माझ्यासाठी खूप खास आहे. मी खूप खुश आहे. हा माझा पहिला अनुभव खूप चांगला होता.” कियाराचा हा व्हिडीओ समोर येताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी कियाराच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आक्षेप घेतला आहे. ‘परदेशात जाताच यांच्यातील इंग्रज जागृत होतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘कियाराने दीपिका आणि आलियाकडून काहीतरी शिकलं पाहिजे होतं. त्यांनी कधीच फेक ॲक्सेंटमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘मी इंग्रज आहे, असं तिला बहुतेक दाखवायचं असेल’, असंही काहींनी म्हटलंय.

कियाराप्रमाणेच अभिनेत्री ऐश्वर्या रायलाही तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून ट्रोल करण्यात आलं आहे. अभिनेत्रींनी फेक ॲक्सेंटमध्ये न बोलता नेहमीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते अधिक चांगलं वाटेल, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. फ्रान्समधील ‘कान’ या ठिकाणी दरवर्षी या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील प्रत्येक विभागाचे ठराविक चित्रपट, माहितीपट यांचं प्रीमिअर केलं जातं.

कियारा पहिल्यांदाच या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय दरवर्षी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते. दरवर्षी तिच्या लूकची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. यंदा ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली असतानाही तिने रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.