फक्त हॅंडसमच नाही तर, कोट्यवधी रुपयांचा मालक आहे सिद्धार्थ मल्होत्रा, आकडा थक्क करणारा

Sidharth Malhotra : आलिशान घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, प्रसिद्धी - संपत्ती..., गडगंज संपत्तीचा मालक आहे अभिनेत्री कियारा अडवाणी हिचा पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा...

फक्त हॅंडसमच नाही तर, कोट्यवधी रुपयांचा मालक आहे सिद्धार्थ मल्होत्रा, आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 3:06 PM

मुंबई | 16 जानेवारी 2024 : बॉलिवूडचा हँडसम, प्रसिद्ध, लोकप्रिय अभिनेता म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा… फार कमी कालावधीत सिद्धार्थ याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत सिद्धार्थ याने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. सिद्धार्थ याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो… आज सिद्धार्थ याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. सध्या सिद्धार्थ याच्या संपत्तीबद्दल चर्चा रंगत आहे. अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत रॉयल आयुष्य जगत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा याचं शिक्षण

सिद्धार्थ मल्होत्रा याचा जन्म दिल्लीत झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थ याने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केलं. पदवीनंतर सिद्धार्थ याने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सिद्धार्थने त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी मॉडेलिंगची सुरुवात केली… मॉडेलिंग क्षेत्रात देखील सिद्धार्थ यान स्वतःचं नाव मोठं केलं…

मॉडेलींगनंतर सिद्धार्थ याने छोट्या पडद्यापासून अभिनय करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ याने ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’ मालिकेतून झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर सिद्धार्थ याने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यााच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर सिद्धार्थ याने करण जोहर दिग्दर्शित ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सिद्धार्थ याने कधीचम मागे वळून पाहिलं नाही..

हे सुद्धा वाचा

‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमानंतर सिद्धार्थ याने ‘मरजावां’, ‘एक विलेन’, ‘अय्यारी’, ‘कपूर एंड सन्स’, ‘बार-बार देखो’ यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण ‘शेरशाह’ सिनेमाच्या माध्यमातून सिद्धार्थ याच्या लोकप्रियेत मोठी वाढ झाली… सिनेमात किआरा मुख्य भूमिकेत होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. रिल आणि रियल लाईफमध्ये देखील सिद्धार्थ किआरा यांची जोडी हीट ठरली…

सिद्धार्थ मल्होत्रा याची संपत्ती…

रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा याच्याकडे तब्बल 75 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुंबईच्या पाली हिल भागात त्यांचे एक लक्झरी बॅचलर पॅड आहे, जे गौरी खान हिने डिझाइन केले आहे. अभिनेता असण्यासोबतच सिद्धार्थ एक मॉडेल देखील आहे. त्यांची मासिक कमाई 50 लाखांपेक्षा जास्त आहे आणि सिद्धार्थ वर्षाला जवळपास 6 कोटी रुपयांची कमाई करतो..

सिद्धार्थला बाईक आणि लक्झरी कार्सचाही शौक आहे, त्याच्याकडे हार्ले डेविडसन अमेरिकन कंपनीची 14 लाख रुपयांची बाइक आणि रेंज रोव्हर, एसयूव्ही, मर्सिडीज बेंझ एमएल 350 सारख्या लक्झरी कार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ मल्होत्राची एकूण संपत्ती 85 कोटी रुपये आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.