अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. जैसरमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच कियाराने लग्नातील आतापर्यंत न पाहिलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
कियाराने आईच्या वाढदिवसानिमित्त लग्नातील फॅमिली फोटो शेअर केले आहेत. 'माझ्या प्रेमळ, सतत काळजी करणाऱ्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
कियाराच्या या फोटोंवर सर्वसामान्य चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सिद्धार्थची सासू खूपच सुंदर आहे, असेही कमेंट्स अनेकांनी केले आहेत. तर कियाराची आई जणू तिची मोठी बहीणच दिसतेय, असंही काहींनी म्हटलंय.
या फॅमिली फोटोंमध्ये कियाराच्या आईसोबतच तिचे वडील आणि भाऊ मिशालसुद्धा दिसत आहे. मिशाल अडवाणीनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा फोटो पोस्ट केला होता. कियाराच्या आईचं नाव जेनेविव अडवाणी असं आहे.
सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.