Kiccha Sudeepa: ‘कडक उत्तर देणार, तो कोण मला माहितीये’, प्रायव्हेट व्हिडीओ लीकच्या धमकीवर अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी मिळाल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप समोर; धमकीबद्दल मोठं वक्तव्य करत अभिनेत्याने व्यक्त केला संताप...
मुंबई : कन्नड अभिनेता किच्चा सुदीप याला एका पत्राच्या माध्यमातून बुधवारी प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली आहे. अभिनेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर किच्चा सुदीप याला पत्राच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. प्रायव्हेट व्हिडीओ लीकच्या धमकीनंतर अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेत्याला धमकी कोणी दिली आहे? हे देखील माहिती आहे. मिळालेल्या धमकीचं कडक उत्तर देवू असं देखील अभिनेता माध्यमांसमोर म्हणाला आहे. (Kiccha Sudeepa News)
किच्चा सुदीप मिळालेल्या धमकीवर म्हणाला, ‘मला माहिती आहे इंडस्ट्री मधील कोणत्या व्यक्तीने मला पत्र पाठवलं आहे. याचं मी कडक उत्तर देईल. मी अशा लोकांसाठी काम ज्यांनी माझ्या कठीण काळात माझी साथ दिली.’ असं अभिनेता म्हणाला. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र किच्चा सुदीप याची चर्चा आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चांवर अभिनेता म्हणाला, ‘मी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नसून, फक्त प्रचार करणार आहे….’ किच्चा सुदीप कन्नड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे.
Yes, I have received a threat letter and I know who sent it to me. I know it is from someone in the film industry. I will give a befitting reply to them. I will work in favour of those who stand by my side in my tough times: Kannada actor Kichcha Sudeep pic.twitter.com/yjX8mZGkKW
— ANI (@ANI) April 5, 2023
बुधवारी अभिनेत्याला धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रानंतर त्याने पुत्तनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू, अशी धमकी या पत्रातून सुदीपला देण्यात आली आहे. सुदीपचा जवळचा मित्र आणि त्याचा मॅनेजर जॅक मंजूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सुदीपचा जवळचा मित्र आणि त्याचा मॅनेजर जॅक मंजूने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम १२०बी, ५०६ आणि ५०४ अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. शिवाय पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किच्चा सुदीपच्या भाजप प्रवेशच्या चर्चांनी जोर धरला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी तो भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर निवडणुकीसाठी तो मोठं कॅम्पेन करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
राज्यात भाजपने बऱ्याच कन्नड कलाकारांकडे यासाठी विनंती केल्याचं समजतंय. पुढच्या महिन्यात निवडणुकीचा प्रचार सुरू होईल. त्यामुळे पक्षाकडून ही जोरदार तयारी सुरू असल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अद्याप किच्चा सुदीपकडून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही.