‘यार तू किती मुलं…’, Gauri Khan हिच्या पोस्टवर किंग खानची लक्षवेधी कमेंट

मुलांसोबत गौरी खान हिचा खास फोटो; कुटुंबच सर्वकाही असतं... असं म्हणणाऱ्या पत्नीच्या पोस्टवर शाहरुख खान म्हणाला..., अभिनेत्याची लक्षवेधी कमेंट

'यार तू किती मुलं...', Gauri Khan हिच्या पोस्टवर किंग खानची लक्षवेधी कमेंट
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:16 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत असतो. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाच्या यशामुळे शाहरुखच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यानंतर नुकताच खान कुटुंबाची एक झलक उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ग्रँड ओपनिंग सेरेमनीमध्ये देखील पहायला. आता लवकरच गौरी खान हिचं नवं पुस्तक प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र गौरीच्या नव्या पुस्तकाची चर्चा रंगत आहे. याच दरम्यान गौरीने नव्या पुस्तकानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. पत्नीच्या फोटोवर किंग खान याची कमेंट मात्र लक्षवेधी ठरली आहे.

गौरी सोशल मीडियावर कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, ‘कुटुंबामुळे घर बनतं…, पेंग्विनइंडिया कॉफी टेबल बुक पुस्तकासाठी उत्सुक आहे…’ असं लिहिलं आहे. गौरीच्या पोस्ट फक्त चाहत्यांनी नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

हे सुद्धा वाचा

गौरीने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करत शाहरुख खान म्हणाला, ‘यार गौरी तू किती उत्तम मुलांना घडवलं आहेस…’ सध्या अभिनेत्याच्या कमेंटची देखील तुफान चर्चा रंगत आहे. गौरी आणि शाहरुख यांनी तीन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव सुहाना खान असून मुलांचं नाव आर्यन आणि अबराम असं आहे. सध्या सर्वत्र गौरी खान हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

इंटिरियर डिझायनर गौरी खान लवकरच ‘माय लाइफ इन डिझाईन’ नावाचे नवीन कॉफी टेबल बुक लॉन्च करणार आहे. एबरी प्रेसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातून वाचकांना तिचा प्रवास जाणून घेता येणार आहे. या पुस्तकात खान कुटुंबाची खास फोटो देखील असणार आहेत. ज्यामध्ये शाहरुख, त्याची तीन मुले आणि त्याचे मुंबईतील प्रसिद्ध घर, मन्नत देखील वाचकांना पाहता येणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, शाहरुख खान याने गौरीच्या पुस्तकाचा अग्रलेख लिहिला आहे. ज्यामध्ये तिचे काही खास डिझाईन प्रोजेक्ट फोटोंसह दाखवण्यात येणार आहेत. एवढंच नाही तर, गौरीने इंटिरिअर डिझायनर बनू इच्छिणाऱ्यांसाठी टिप्सही शेअर केल्या आहेत. तिच्या काही प्रसिद्ध बॉलीवूड ग्राहकांमध्ये करण जोहर, जॅकलीन फर्नांडिस, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रणबीर कपूर यांचा समावेश आहे. सध्या सर्वत्र गौरी खान हिच्या फोटोंची चर्चा आहे.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....