Family | कुटुंबासाठी अभिनेत्याने केलं सर्वकाही, कोट्यवधींचं घर बांधलं, पत्नीसमोर स्वतःचं दुःख लपवलं पण…

Family | पैशांसाठी 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, कोट्यवधी रुपयांचं घर तर बंधलं, पत्नी समोर आल्यानंतर..., खुद्द अभिनेत्याने सांगितली आयुष्यातील वाईट दिवसांमध्ये ओढावलेली परिस्थिती... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

Family | कुटुंबासाठी अभिनेत्याने केलं सर्वकाही, कोट्यवधींचं घर बांधलं, पत्नीसमोर स्वतःचं दुःख लपवलं पण...
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 11:02 AM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी अनेकदा खस्ता खाल्ला. कुटुंबाच्या आनंदासाठी अनेक मर्यादा ओलांडल्या आणि स्वतःचं दुःख मात्र मनाच्या एका कोपऱ्या दडवून ठेवलं. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते किरण कुमार. गेल्या अनेक वर्षांपासून किरण कुमार चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका देखील बजावली. ६९ वर्षीय किरण कुमार यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढ – उतारांबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र किरण कुमार यांची चर्चा रंगली आहे.

किरण कुमार यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली, जेव्हा त्यांना बी आणी सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करावं लागलं. किरण कुमार यांना स्वतःच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. पण आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांमुळे किरण कुमार कधीच खचले नाहीत.

मोठ्या धौर्याने किरण कुमार यांनी परिस्थिती हाताळली. कुटुंबाबद्दल देखील किरण कुमार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र किरण कुमार यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. किरण कुमार म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आनंदाची बातमी देता, तेव्हा कुटुंब देखील तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतं..’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेते म्हणाले, ‘पण जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पैशांसाठी काम करता, मी देखील काही सिनेमे पैशांसाठी केले आहे. तेव्हा तुम्ही एका वेगळ्या परिस्थितीत असता. समोर आलेली परिस्थितीत नकारात्मक नसते. फक्त ती परिस्थिती तुम्हाला स्वीकारता येत नाही. जर तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितलं तर, ती दुःखी होणार…’

‘मी कायम माझ्या पत्नीपासून माझ्या भावना लपवून ठेवल्या. जेव्हा मी घरी यायचो तेव्हा मला प्रचंड वाईट वाटायचं, पण मी पत्नीसमोर कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचो. फक्त घराबाहेर असलेल्या पिलर्सकडे पाहायचो. एक पिलर ४ लाख रुपयांचा होता, असे एकून ११ पिलर्स होते आणि त्यांची किंमत होती ४४ लाख रुपये…’

‘माझं घर उभं राहिलं तेव्हा माझ्या करियर धोक्यात होतं. घर तयार होण्यासाठी ६ वर्ष लागली. पैसै एकत्र करत होतो. त्यासाठी बी आणि सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करत होतो. मी कधीच सिनेमांवर टीका करणार नाही. कारण त्यामुळे माझं घर तयार झालं आहे.’ असं देखील किरण कुमार म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.