Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वाह, काय टायमिंग साधलंत!’; अमोल मिटकरींच्या ‘भार्या समर्पयामि’ वक्तव्यानंतर किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

या वादादरम्यान अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'वाह, काय टायमिंग साधलंत किरणजी' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

'वाह, काय टायमिंग साधलंत!'; अमोल मिटकरींच्या ‘भार्या समर्पयामि’ वक्तव्यानंतर किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Kiran Mane and Amol MitkariImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:27 PM

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कन्यादान आणि लग्नाच्या विधीविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. एकीकडे पुण्यात ब्राह्मण महासंघाने (Brahman Mahasangh) त्यांचा विरोध केला तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या वादादरम्यान अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘वाह, काय टायमिंग साधलंत किरणजी’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. किरण माने यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील एका एपिसोडमधील छोटा क्लिप आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘अराजकीय’ असं कॅप्शन लिहून हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

अमोल मिटकरी यांनी सांगली इथल्या एका सभेत लग्नातील विधीतील श्लोक म्हणून दाखवला. यावेळी त्यांनी हनुमान चालीसाही म्हणून दाखवली. देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, यांची नक्कल करून दाखविली. उपस्थितांचं त्यांनी चांगलंच मनोरंजन केलं. पण, जोशात येऊन त्यांनी कन्यादानावरून भलतंच वक्तव्य केलं. लग्नातील विधीबाबत मिटकरी बोलत असताना उपस्थितांना हसू आवरलं नाही. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे त्याठिकाणी होते. ते पोटभरून हसले. पण, हिंदुत्ववादी संघटनांनी मिटकरींच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला.

किरण मानेंनी शेअर केला व्हिडीओ-

किरण माने यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत हास्यजत्रेचे कलाकार एक स्किट सादर करताना दिसत आहेत. यामध्ये समीर चौघुले हे ब्राह्मणाच्या भूमिकेत असून एका जोडप्याचं ते लग्न लावताना दिसत आहे. लग्नाच्या विधींदरम्यान त्यांनी अनेक विनोद करत परीक्षकांना आणि उपस्थितांना खळखळून हसवलं. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘लय भारी सर, योग्य वेळी अराजकीय पोस्ट शेअर केली’, असं एकाने लिहिलं. तर ‘रिअल लाईफमधल्या या बिनधास्तपणामुळे लोक प्रेमात आहेत तुमच्या,’ असं दुसऱ्याने लिहिलं. अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा:

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक

Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.