‘या’ कारणामुळे आमिर खान आणि किरण राव यांच्यात वाद, हेच घटस्फोटाचे..

बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असतो. आमिर खान याची मुलगी इरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच विवाह पार पडला. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप झाल्यापासून तो मोठ्या पडद्यापासून दूर गेलाय.

'या' कारणामुळे आमिर खान आणि किरण राव यांच्यात वाद, हेच घटस्फोटाचे..
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 7:45 PM

मुंबई : आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच आमिर खान याच्या लेकीचा विवाह पार पडलाय. आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव आणि आमिर खान हे अनेकदा एकसोबत स्पाॅट होतात. आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये किरण राव हिने आमिर खान आणि तिच्या रिलेशनवर मोठे भाष्य केले आहे. किरण राव ही तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. किरण राव ही या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. घटस्फोट झाला असला तरीही किरण राव आणि आमिर खान हे एकत्र काम करतात.

किरण राव ही गेल्या 16 वर्षांपासून आमिर खान याच्या प्रॉडक्शन हाऊस बरोबर जोडली गेली आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण राव हिने थेट आमिर खान याच्यासोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य केले. किरण राव म्हणाली की, आम्ही एकमेकांवर अवलंबून आहोत. कारण आम्ही नेहमीच एकमेकांना स्पष्ट आणि खरे बोलू शकतो.

मुळात म्हणजे मला वाटते की, प्रत्येक नात हे असेच असावे. जर नात्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर नात्याची कधीच प्रगती होत नाही. मी आणि आमिर दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र काम करतो. जर आपल्या नात्यात सत्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ नाही. बऱ्याच वेळा असे होते की, आम्ही दोघे एकमेकांच्या विचारासोबत सहमत नसतो.

एकमेकांच्या प्रत्येक निर्णयामध्ये नेहमीच सहमत असावे असेही नाही. बऱ्याच वेळा आमच्यामध्ये वाद देखील होतात हे देखील किरण राव हिने म्हटले. पुढे किरण राव हिने म्हटले की, मी बऱ्याच वेळा आमिर खान याच्या विचारांबद्दल अजिबातच सहमत नसते. परंतू, आमिरमधील निर्देशक, प्रोड्यूसर आणि अभिनेता म्हणून ते निर्णय स्वीकार करावे लागतात.

ज्यावेळी मग फिडबॅकचा विषय येतो, त्यावेळी मी आणि आमिर दोघेही स्पष्टपणे बोलतो. सरळ आम्ही एकमेकांना सांगतो की, ही गोष्ट अजिबात आवडली नाही वगैरे. कोणत्याही नात्यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे किरण राव हिने म्हटले आहे. किरण राव ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.