अखेर किरण रावची थेट कबुली, म्हणाली, घटस्फोटानंतरही मी आमिर खानचा..
Aamir Khan and Kiran Rao Divorce : आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. किरण राव हिचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. किरण रावने थेट आमिर खान याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल थेट मोठे विधान केले आहे. किरणचे बोलणे ऐकून लोकांना धक्का बसलाय.
मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. सोशल मीडियावर पोस्ट करत आपण घटस्फोट घेतला असल्याचे आमिर खानने म्हटले. मात्र, घटस्फोटानंतरही अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना किरण आणि आमिर खान दिसतात. लापता लेडीज या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना किरण राव आणि आमिर खान हे दिसले. किरण राव हिचा लापता लेडीज हा चित्रपट रिलीज झालाय. आता नुकताच किरण राव हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये किरण राव ही थेट आपल्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसलीये.
किरण राव हिने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना किरण राव दिसली. आपल्या आणि आमिर खान याच्या घटस्फोटाबद्दल बोलताना किरण राव दिसली. किरण राव हिने घटस्फोटानंतर आमिर खानचा कसा फायदा घेतला हे सांगताना दिसली. आता किरण रावच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. किरण थेटपणे बोलताना दिसली.
किरण राव म्हणाली की, आमिर खान याचा मी घटस्फोटानंतरही निर्लज्जपणे फायदा घेत आहे. मी आमिरच्या स्टारडमचा फायदा घेत आहे. मी लापता लेडीज चित्रपटासाठी आमिरचे नाव वापरले हेच नाही तर प्रमोशनसाठी देखील त्याचा फायदा करून घेतला. पुढे किरण राव म्हणाली, लापता लेडीज चित्रपटाचे मी दिग्दर्शन केले आहे.
परंतू या चित्रपटाला आमिर खान याचा पैसा लागला आहे. हेच नाही आमिरच्याच प्रॉडक्शन हाऊस खाली हा चित्रपट तयार झाला. मी आमिरचा पूर्ण फायदा घेत आहे. मी त्याची स्टार पावर वापरत आहे. आता किरण राव हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे. किरण राव हिचे हे बोलणे ऐकून अनेकांना धक्का बसल्याचे देखील दिसत आहे.
किरण राव हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, माझा आणि आमिर खानचा घटस्फोट झाला असला तरीही आम्ही एकाच इमारतीमध्ये राहतो. हेच नाही तर आम्ही जेवणही एकत्र करतो. आमचा घटस्फोट झाला असला तरीही आमच्या नात्यावर त्याचा काही परिणाम झाला नाहीये. हे लोकांना ऐकायला थोडे वेगळे वाटेल, परंतू हे खरे आहे. आता तर मोठा खुलासाच किरण राव हिने केला आहे.