Aamir khan: सावत्र आई बद्दल असं काय म्हणाला आमिर खानचा मुलगा? ‘किरण आमच्या कुटुंबातील…’

| Updated on: Jul 13, 2024 | 4:49 PM

Aamir khan: 'किरण आमच्या कुटुंबातील...', सावत्र आई किरण राव हिच्याबद्दल आमिर खान याच्या मोठ्या मुलाचं मोठं वक्तव्य, सर्वत्र चर्चांना उधाण, 'महाराज' सिनेमामुळे आमिर खान याचा मुलगा आहे चर्चेत...

Aamir khan: सावत्र आई बद्दल असं काय म्हणाला आमिर खानचा मुलगा? किरण आमच्या कुटुंबातील...
Follow us on

अभिनेता आमिर खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता आमिर खान त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, मुलगा जुनैद खान याच्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैद याने वडील आमिर खान आणि सावत्र आई किरण राव यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैद याने स्पष्ट केलं आहे की, आमिर खान त्यांच्या कुटुंबातील उत्तम अभिनेता नसून, किरण राव आमच्या कुटुंबातील उत्तम अभिनेत्री आहे… असं वक्तव्य जुनैद खान याने केलं आहे.

एवढंच नाहीतर, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमासाठी ऑडिशन दिल्याचं देखील जुनैद खान याने मुलाखतीत सांगितलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैद याने त्याच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी आतापर्यंत 7 ते 8 सिनेमांसाठी ऑडिशन दिल्या आहेत. पण माझी निवड झाली नाही.’

पुढे जुनैद याला सावत्र आई किरण राव हिला तुझा ‘महाराज’ सिनेमा कसा वाटला? असा प्रश्न विचारला यावर जुनैद म्हणाला, ‘किरणला माझा सिनेमा प्रचंड आवडला. तिने माझं कौतुक देखील केलं…’ एवढंच नाही तर, जवळपास 35 वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत असलेल्या आमिरपेक्षा किरण उत्तम अभिनेत्री आहे असा दावाही जुनैदने केला.

हे सुद्धा वाचा

‘आमिर नाही तर, किरण कुटुंबातील उत्तम अभिनेत्री आहे. मी तिच्यासोबत लाल सिंग चड्ढाच्या ऑडिशनमध्ये काम केलं होतं. त्यामुळे याठिकाणी मी ठामपणे सांगू शकतो की, किरण उत्तम अभिनेत्री आहे…’ असं जुनैद म्हणाला. सांगायचं झालं तर, किरण राव दिग्दर्शिक ‘लापता लेडिज’ सिनेमाल देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. सोशल मीडियावर आजही सिनेमाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

जुनैद खान स्टारर ‘महाराज’ सिनेमा

जुनैद खान याच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचा ‘महाराज’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये जुनैद याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. ‘महाराज’ सिनेमात जुनैद याच्यासोबत जयदीप अहलावत, शरवरी वाघ आणि शालिनी पांडे यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे.

‘महाराज’ सिनेमात झळकण्यापूर्वी जुनैद खान याने ‘प्रितम प्यारे’ सिनेमात देखील काम केलं आहे. सिनेमात जुनैत पाहुण्या कलाकाराच्या भूमित झळकला होता. आता आगामी सिनेमात जुनैद अभिनेत्री साई पल्लवी हिच्यासोबत देखील झळकरणार असल्याची चर्चा रंगली आहे.