वर्षभर लिव्ह इनमध्ये, लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट, अखेर किरण राव हिने सांगितले आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचे खरे कारण

Aamir Khan and Kiran Rao Divorce : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच चर्चेत असतो. आमिर खान आणि किरण राव हे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. आता नुकताच किरण राव ही पहिल्यांदाच तिच्या आणि आमिर खानच्या घटस्फोटाबद्दल थेट बोलताना दिसली आहे.

वर्षभर लिव्ह इनमध्ये, लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट, अखेर किरण राव हिने सांगितले आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचे खरे कारण
Kiran Rao and Aamir Khan
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 3:10 PM

आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव ही चांगलीच चर्चेत आहे. आता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाला काही वर्षे उलटली आहेत. मात्र, त्यांनी कधीच त्यांचा घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे सांगितले नाही. आता इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच आमिर खान याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना किरण राव ही दिसली आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण राव ही घटस्फोटाबद्दल बोलताना दिसलीये. यावेळी जरा स्पष्टच बोलताना किरण राव ही दिसली. आता किरण राव हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

किरण राव म्हणाली की, नक्कीच मी माझा संपूर्ण वेळ घेतला. यामुळेच मला काही काळजी नव्हती. मुळात म्हणजे मी आणि आमिर दोघेही खूप जास्त मजबूत आहोत, फक्त आम्हीच नाही तर आमचे नातेही तेवढेच मजबूत आहे. आम्ही एकमेकांशी खूप जास्त जोडले गेलेलो आहोत. आम्ही एकमेकांचा खूप आदर देखील करतो.

यामुळेच मला कोणत्याही गोष्टींची काळजी अजिबातच नव्हती. पुढे किरण राव म्हणाली की, मला एक स्पेस हवा होता. मला माझ्या पद्धतीने मुक्तपणे जीवन जगायचे होते. मला काही गोष्टींमध्ये स्वत:ची प्रगती करायची होती. हेच नाही तर आमिरने माझ्या निर्णय स्वीकारला आणि मला सपोर्ट देखील केला. आमिरने माझी खूप मदत केली.

यासर्व गोष्टींमुळे मला घटस्फोटाची अजिबातच भिती वाटली नाही. हेच नाही तर किरण राव हिने हा देखील खुलासा केला की, ती आणि आमिर खान लग्नाच्या अगोदर तब्बल 1 वर्ष लिव इनमध्ये राहत होते. पहिल्यांदाच आमिर खान याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल असे जाहिरपणे बोलताना किरण राव ही दिसत आहे.

आता किरण राव हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. किरण राव हिने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मी आणि आमिर खान एकाच इमारतीमध्ये राहतो. हेच नाही तर आम्ही जेवणही एकत्र करतो. किरण राव आणि आमिर खान यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, यांच्या घटस्फोटाचे कारण समजू शकले नव्हते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.