Kiran Rao | आमिर खान याच्यासोबत असलेल्या नात्यावर किरण राव हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, त्याने नेहमीच…
आमिर खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. आमिर खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांपासून दूर आहे. आमिर खान आणि सलमान खान यांचा काही दिवसांपूर्वीच एक फोटो व्हायरल झाला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान याच्यासोबत करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही आमिर खान आणि करिना कपूर दिसले. विशेष बाब म्हणजे हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा रोष बघायला मिळाला.
सतत सोशल मीडियावर लाल सिंह चढ्डा चित्रपटावर टिका केली जात होती. इतकेच नाही तर अनेकांनी लाल सिंह चढ्डा चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची थेट मागणी केली. याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे सांगितले जाते. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा पूर्णपणे तुटलेला दिसला. त्यानंतर त्याने मोठा निर्णय घेतला.
आमिर खान याने जाहिर केले की, सतत चित्रपटांमध्ये काम करत असल्याने अनेक वर्षे कुटुंबियांना अजिबातच वेळ देऊ शकलो नाहीये. यामुळे पुढील काही दिवस फक्त आणि फक्त कुटुंबियांना वेळ देणार. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे देखील बघायला मिळाले. आमिर खान आणि सलमान खान यांचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसला.
नुकताच आता आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच किरण राव ही आमिर खान आणि तिच्या घटस्फोटाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसली. आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट चित्रपटाच्या सेटवर झालीय. किरण राव आणि आमिर खान यांनी 2005 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आता नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण राव म्हणाली की, निर्माते आणि माझ्या एक्स पतीसोबत संबंध नक्कीच खूप चांगले आहेत. मला माझ्या कुटुंबाकडून आणि आमिर याच्याकडून नेहमीच पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच हे सर्व शक्य आहे, मला असे कायमच वाटते. पहिल्यांदाच किरण राव ही आमिर खान आणि तिच्या नात्याबद्दल असे जाहिरपणे बोलताना दिसली आहे.
यावेळी किरण राव ही तिच्या लापता लेडीज चित्रपटाबद्दल बोलताना दिसली. किरण राव हिने आमिर खान याला या चित्रपटाचे श्रेय दिले. आमिर खान हा नसता तर हे शक्यच नसल्याचे सांगताना देखील किरण राव ही दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच किरण राव आणि तिचा मुलगा आणि आमिर खान हे विदेशात फिरताना दिसले. याचे काही फोटोही व्हायरल झाले.