‘या’ कारणामुळे आमिर खान-रिना दत्ताचा संसार मोडला? अखेर किरण रावने केलं स्पष्ट

कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये आमिर म्हणाला होता, "रिना आणि मी 16 वर्षे सोबत होतो. जेव्हा आम्ही विभक्त झालो, तेव्हा तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता." आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं.

'या' कारणामुळे आमिर खान-रिना दत्ताचा संसार मोडला? अखेर किरण रावने केलं स्पष्ट
आमिर खान, किरण राव, रिना दत्ताImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 8:42 AM

मुंबई : 13 मार्च 2024 | किरण रावला डेट करण्याआधी अभिनेता आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरानंतर 2002 मध्ये आमिर आणि रिना विभक्त झाले. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता तब्बल 22 वर्षांनंतर किरणने या चर्चांवर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरणने स्पष्ट केलं की ‘लगान’च्या शूटिंगदरम्यान ती आमिरशी फार क्वचित बोलली होती. चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर 2004 मध्ये आमिर आणि किरण एकमेकांना डेट करू लागले होते.

“अनेकांना असं वाटतं की आमिर आणि माझ्या रिलेशनशिपची सुरुवात ‘लगान’ या चित्रपटापासून झाली. पण यात काहीच सत्य नाही. खरंतर ‘स्वदेस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्यावेळी तो ‘मंगल पांडे’ या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात करणार होता. आम्ही ‘कोक’ या ब्रँडसाठी आशुतोष गोवारिकरसोबत काही जाहिराती शूट केल्या आणि त्याचवेळी आमिर आणि माझ्यात जवळीक निर्माण झाली होती. हे सर्व ‘लगान’ प्रदर्शित झाल्यानंतर 3-4 वर्षांनी घडलं होतं. मी त्याच्या संपर्कातही नव्हते. किंबहुना ‘लगान’च्या सेटवर मी आमिरशी फार कमी बोलायचे. त्यावेळी मी दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होते. जेव्हा आमिर आणि मी 2004 मध्ये एकमेकांना डेट करू लागलो, तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की ‘लगान’च्या शूटिंगपासून आम्ही एकत्र आलो आणि त्यामुळे आमिरचा घटस्फोट झाला. पण यात काहीच तथ्य नाही”, असं किरणने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

याविषयी किरण पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करता, जो आधी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा त्यासोबत एक ओझं तुमच्या नात्यात येतं, ज्याचा परिणाम रिलेशनशिपवर होतो. मी कपल काऊन्सलिंगचा आवर्जून सल्ला देईन. आमिर आणि मीसुद्धा कपल काऊन्सलिंग केलं होतं. त्याठिकाणी तुमच्या गरजा आणि समोरच्या व्यक्तीला कोणत्या नजरेतून पाहता याविषयी स्पष्टता येते. या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे आमिर आणि मी एकमेकांशी प्रामाणिक राहण्यात खूप मदत झाली. कोणतीही परिस्थिती असली तरी आम्ही एकमेकांशी प्रामाणिक राहिलो.”

आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला. आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.