Aamir Khan | आमिरच्या कामाबद्दल मला काय सुनावता ? किरण रावचं दिग्दर्शकाला प्रत्युत्तर
आमिर खानच्या 'दिल' चित्रपटातील रोलवरून संदीप रेड्डी वांगाने तिखट बोल सुनावले होते. त्यावर आता आमिरची माजी पत्नी किरण राव हिने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमिर खान किंवा त्याच्या कामाबद्दल बोलायंच असेल तर..

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची माजी पत्नी आणि दिग्दर्शक किरण राव सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याबरोबरच तिने केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळेही चर्चा सुरू झाली होती. किरण राव हिने संदीप रेड्डी वांगा याचा कबीर सिंग तसेच बाहुबली यासारख्या चित्रपटांना महिलाविरोधी म्हटलं होतं. त्यातील स्टॉकिंगबद्दल तिने वक्तव्य केलं होतं. मात्र हे न रुचल्याने संदीप रेड्डीने किरण रावला प्रत्युत्तर देत खडे बोल सुनावले. त्याने तिचा माजी पती आणि अभिनेता आमिर खानच्या ‘दिल’ चित्रपटातील दृश्याचा दाखला देत टीका केली होती. किरण रावने जाऊन दिल चित्रपट पहावा, ज्यामध्ये आमिर खान त्यातील नायिकेला बलात्काराची धमकी देतो, असे संदीपने म्हटले होते. त्यावर आता किरणनेही प्रत्युत्तर दिले असून आमिरच्या कामाबद्दल त्याच्याशीच बोलावं असं सांगितलं आहे.
किरण राव सध्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामध्ये व्ययस्त असून त्याची बरीच चर्चाही सुरूये. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला संदीप रेड्डी वांगाने केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. वांगा तुझ्याबद्दल बोलत आहे आणि तूही त्याला प्रत्युत्तर दिलं आहेस, याचा फायदा तुझ्या येणाऱ्या चित्रपटाला होत आहे का ? असं तिला विचारण्यात आलं. ‘ उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटलं आणि मी ते ( उत्तर) दिलं. लोकांना हे माहीत असेल की मी कोण आहे आणि माझा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार आहे,’ असं किरण राव म्हणाली.
काय होता वाद ?
काही दिवसांपूर्वी किरण राव हिने ‘कबीर सिंह’ आणि एसएस राजामौली याच्या ‘बाहुबली’ सिनेमाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘कबीर सिंह’, ‘बाहुबली’ यांसारखे सिनेमे स्टॉकिंगला दुजोरा देतात… असं किरण म्हणाली होती. त्यावर संदीप रेड्डीनेही प्रत्युत्तर दिलं. त्याने आमिर खानची भूमिका असलेल्या ‘दिल’ सानेमाचा दाखला देत किरण राव हिच्यावर निशाणा साधला. त्या सिनेमात आमिर ज्या तरूणाची भूमिका साकारत होता, तो तरूण माधुरी दीक्षित हिने साकारलेल्या तरूणीला बलात्कार करण्याची धमकी देतो.
काही लोकांना कळत नाही, की ते काय करत आहेत. मला असं वाटतं स्टॉकिंग आणि अप्रोचिंग यांमध्ये प्रचंड अंतर आहे, असंही तो म्हणाला होता. त्याने पुढे ‘दिल’ सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं. मला सांगायचं आहे की, जा आणि आमिर खान याला विचारा ‘खंबे जैसी खडी है’ गाण्याबद्दल विचारा ते काय होतं? असा सवाल त्याने किरण रावला विचारला होता.
त्यानंतर किरण राव आमिर खानचा बचाव करताना दिसली. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, ‘ प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर , मिस्टर रेड्डी यांना आमिरला काही सांगायचं असेल, तर त्यांनी पर्सनली आमिरला सांगावं. मी आमिर खान किंवा त्याने केलेल्या कामासाठी जबाबदार नाही,’ अस तिने नमूद केलं. किरण रावने यापूर्वी ‘धोबीघाट’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता तिचा ‘लापता लेडीज’ हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.