Salman Khan : सानिया मिर्झाच्या मुलासोबत ‘भाईजान’ची मस्ती, व्हिडीओ व्हायरल

'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत असलेल्या समान खान याची सानिया मिर्झा हिच्या मुलासोबत मस्ती... दोघांच्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा...

Salman Khan : सानिया मिर्झाच्या मुलासोबत 'भाईजान'ची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 5:45 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र सलमान आणि ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत असताना, अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिच्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. भाईजान आणि सानियाच्या लेकाचा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडत आहे. शिवाय चाहते व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडीओ सानिया मिर्झा हिची बहीण अनम हिने सोशल मीडियावर पोस्ट केला असून, व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खान नुकताच दुबईहून भारतात परतला आहे. सलमानचा हा व्हिडीओ दुबईतील आहे. जिथे अभिनेता सानिया हिचा मुलगा आणि बहीण यांच्यासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान आणि सानिया मिर्झाचा मुलगा इझहान मलिकसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान इझहान आणि सानियाच्या बहिणीसोबत जबरदस्त पोझ देताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa)

सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘दुबईत २४ तास. पुढील आठवडाभर मेहनत करण्याची ऊर्जा मिळाली.’ असं लिहीलं आहे. अनम हिच्या व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता आणि सानियाच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा २१ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. आतापर्यंत सिनेमाने जवळपास ८२.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि अभिनेत्र शहनाज गिल यांनी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता सलमान खान याचा ‘टायगर 3’ सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.