Salman Khan याला गर्लफ्रेंडच्या वडिलांनी जेव्हा घरात रंगेहात पडलं; अभिनेता कपाटात लपला त्यानंतर…
सलमान खान याने एक्स गर्लफ्रेंडसोबत घालवलेल्या 'त्या' क्षणांच्या सांगितल्या आठवणी; तिच्या वडिलांनी अभिनेत्याला घरात रंगेहात पकडलं आणि.. कोण होती 'ती'?
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून एका वेगळ्या भूमिकेत भाईजान चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला सलमान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आजपर्यंत सलमान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमानचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. सलमान कायम आयुष्यातील काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ‘दस का दम’ शोमध्ये अभिनेत्यानं एक्स गर्लफ्रेंडबद्दल एक आठवण सांगितली. सध्या सर्वत्र सलमान खान आणि एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगत आहे.
एक्स गर्लफ्रेंडच्या वडिलांनी सलमानला रंगेहात पकडलं होतं. सलमानने सांगितलं की, गर्लफ्रेंडचे आई-वडील घरी नसल्यामुळे अभिनेता तिला गुपचूप भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना घरी परतण्यासाठी उशीर होणार होता. पण गर्लफ्रेंडचे आई-वडील लवकर घरी पोहोचले, ज्यामुळे अभिनेता आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रचंड घाबरले.
गर्लफ्रेंडचे आई-वडील येताच अभिनेता घरात एका कपाटात लपला होता. पण गर्लफ्रेंडच्या वडिलांनी भाईजानला पकडलं. कपाट अनेक दिवस बंद असल्यामुळे धूळ जमा झाली होती. ज्यामुळे अभिनेत्याला शिंका आली. सलमानच आवाज ऐकताच तिच्या वडिलांना कळालं. पण एक्स गर्लफ्रेंडचे वडील रागावले नाही तर ‘मुलगा चांगला आहे…’ असं म्हणाले.
यावेळी अभिनेत्याने एक्स गर्लफ्रेंडसोबत घालवलेल्या खास क्षणांच्या आठवणी तर सांगितल्या पण तिचं नाव सांगितलं नाही. सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं, पण कोणत्याचं अभिनेत्रीसोबत भाईजानचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण आज देखील सलमानच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. सलमान खान याने ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांना डेट केलं आहे.
सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.अभिनेता गेल्या काही दिवसांपासून आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.