
गायक मिका सिंग 10 जून रोजी म्हणजेच आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंगची गाणी तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. मिका सिंग आपल्या गाण्यामुळे चर्चेत आहे. मात्र अनेक वादांशीसुद्धा त्याचं नाव जोडलं गेलं आहे. चला तर मग मिका सिंगशी संबंधित वादांबद्दल जाणून घेऊया.

2006 मध्ये मिका सिंग अचानक चर्चेत आला होता. राखी सावंतला किस केलेलं प्रकरण कोणीच विसरू शकत नाही. मिका सिंगनं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत जबरदस्तीनं राखीला किस केलं अशी चर्चा होती. राखीला किस करतानाचे मिकाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

सलमान खानप्रमाणेच मिका सिंगवरही हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मिकावर त्याच्या कारनं ऑटोला धडक दिल्याचा आरोप होता. या अपघातात ऑटोमधील लोक जखमी झाले होते. प्रत्येक हिट अँड रन प्रकरणात अडकलेल्या आरोपींप्रमाणेच मिकानंही वाहन चालवत नसल्याचा युक्तिवाद केला होता.

मिका सिंगवरही अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत. त्याच वेळी, वर्ष 2018 मध्ये, 17 वर्षीय ब्राझीलच्या मॉडेलनं मिकावर आरोप केला. असा आरोप केला जात होता की मिकानं तिला आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. मिकाविरूद्ध दुबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर सिंगरला तुरूंगात जावं लागलं होतं.

मिका सिंगनं एकदा थेट कॉन्सर्टदरम्यान डॉक्टरांना मारलं होतं. त्यानंतर, त्यानं स्पष्टीकरण देताना सांगितलं की डॉक्टरांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचं त्यामुळे त्याला राग आला. या प्रकरणात मिकाविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

एका फोटोत मिकाच्या गालावर लिपस्टिकचे डाग होते. याविषयी म्हटलं गेलं होतं की बिपाशानं त्याला किस केलं. यावरुन मिका वादात अडकला होता. त्यानंतर त्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं. तेव्हा तो म्हणाला की ते बिपाशानं नाही तर त्याच्या आज्जीचं लिपस्टिक होतं.

सध्या मिका सिंग कमल राशिद खानसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. केआरकेनं मिकाचं वर्णन लुक्खा सिंगर म्हणून केलं असून त्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरूच आहे. मिका अगदी केआरकेला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरी गेला पण केआरके घरी नव्हता.