Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर केएल राहुल – आथिया शेट्टी होणार आलिया – रणबीरचे शेजारी; लग्नाची तारीख समोर

शेट्टी कुटुंबात लवकरच वाजणार सनई-चैघडे; बॉलिवूडचं नवीन जोडपं होणार आलिया - रणबीरचे शेजारी

लग्नानंतर केएल राहुल - आथिया शेट्टी होणार आलिया - रणबीरचे शेजारी; लग्नाची तारीख समोर
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी कायमच चर्चेत असते. अथियाला आपल्या बाॅलिवूड करिअरमध्ये अजून काही खास कामगिरी करता आली नाहीये. आज अथियाचा 30 वा वाढदिवस आहे.
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 3:11 PM

KL Rahul – athiya shetty : अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहे. २०२३ मध्ये अथिया आणि राहुल विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. पण रंगणाऱ्या लग्नाच्या चर्चांवर अद्याप आथिया आणि केएल राहुल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रंगणाऱ्या चर्चांदरम्यान जानेवारी महिन्यात आथिया आणि केएल राहुल नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आता दोघांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आथिया आणि केएल राहुल जानेवारी महिन्यात २० तारखे नंतर लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एवढंच नाही, तर आथिया आणि केएल राहुल लग्नानंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचे शेजारी असणार आहेत. आथिया आणि केएल राहुल लग्नानंतर आलिया-रणबीरच्या घरापासून दोन बिल्डिंग दूर असलेल्या बिल्डिंगमध्ये राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केएल राहुल आणि आथिया यांचं लग्न अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा याठिकाणी असलेल्या बंगल्यामध्ये होणार आहे. मोठ्या थाटात दोघांचं लग्न होणार असल्याची चर्चा रंगत आहे. केएल राहुल आणि आथिया यांच्या लग्नात खास पाहुणे हजेरी लावणार आहेत.

केएल राहूल आणि आथिया यांच्या लग्नात बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटी नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी लग्नात हजर राहणार आहेत. शिवाय अन्य पाहुण्यांसाठी अनेक सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

केएल राहुल आणि आथिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नाही, तर केएल राहूल आणि आथिया यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.