पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!
गीतकार दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण अवघं इयत्ता पाचवीपर्यंतच झालं होतं. (know about damodar shirwale's hit bhim geet)
मुंबई: गीतकार दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण अवघं इयत्ता पाचवीपर्यंतच झालं होतं. त्यांनी गाणं शिकण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु केवळ 12 रागच ते शिकू शकले. कारण त्यांचं पाठांतर होत नसे. त्यामुळे त्यांनी गाणं शिकणंही सोडलं. पण या रागाच्या बिदागीवरच त्यांनी दर्जेदार गाणी लिहिली. (know about damodar shirwale’s hit bhim geet)
इयत्ता पाचवीनंतर शाळा सोडली
दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण खूप उशिरा सुरू झालं. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना पहिल्या इयत्तेत टाकण्यात आलं होतं. वर्गात ते सर्व मुलांमध्ये थोराड दिसायचे. वाढते वय आणि गरीबी यामुळे त्यांचं शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झालं. 1966 मध्ये ते राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये कामाला लागले. 1970मध्ये ते परमनंटही झाले. 2005मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ वाचन, लिखाण आणि गायन याला त्यांनी दिला होता.
12 राग ठरली जीवनाची पुंजी
शिरवाळे यांनी 1964 पासून गायनास सुरुवात केली. त्यांनी दामोदर शिरवाळे आणि पार्टीची स्थापना केली होती. सुरुवातीला ते दुसऱ्या गायकांची गाणी गायचे. शिरवाळे यांना उत्तम गायक व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी चेंबूरमधील पंडित नारायणगावकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. सात महिने त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. संगीताचे धडे घेत असतानाचा एक किस्सा आहे. नाराणगावकर यांनी त्यांना प्रथम यमन राग दिला. त्यानंतर भोग, काफी आणि केदार राग दिला. पण शिरवाळे यांचं पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायचं. तब्बल सात महिने हे असंच सुरू होतं. ते सर्व राग विसरायचे. या सात महिन्यात जेमतेम 12 राग शिकल्यानंतर त्यांनी गाणं शिकणंच बंद केलं. मात्र, या अर्धवट ज्ञानाचाही त्यांना फायदा झाला. त्यांना गाण्याच्या चाली बांधण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मीटरचं इंगित त्यांना समजलं.
गाजलेली लोकगीतं
शेजारीण बाई, तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, बाबूला आतमधी घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या…
आणि
मनात हाय आता सांगू मी काय, कशी काय येऊ मी रंगतीला, म्हातारा नवरा गंमतीला…
आणि
कशाचं खरं खोटं पिकतंय रं, गेलं ते असली, नकली विकतंय रं…
आणि
खंडोबा रायाचं याड बाई लागलं, मुरळीला, लागलं मुरळीला, याड बाई लागलं वाघ्याला…
आणि
घाईन जाऊन लाईन लावून, तिकीट काढायचं, या वेडीला मनकवडीला माहेरी धाडायचं….
गाजलेली आंबेडकरी गीते
भीमानं दिलं ते गगनासम निशाण आहे, निळा झेंडा, निळ्या टोपीचा स्वाभिमान आहे…
आणि
बोले गाव गाव बाई बोले गाव गावं भीमाईचा बाळ त्याचं नाव भीमरावं…
आणि
नऊ कोटींची माता रमाई, उदार अंत:करणाची, रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची…
आणि
आसित मुनीची ती भविष्यवाणी, आली आली फळाला, सिद्धार्थ सम्यक समबुद्ध झाला…
आणि
रमाबाईचा जन्म झाला, वाटा साखर पानं… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about damodar shirwale’s hit bhim geet)
संबंधित बातम्या:
‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का?
(know about damodar shirwale’s hit bhim geet)