Net Worth | सलमानसाठी ‘राधे’ बनवणाऱ्या प्रभुदेवाच्या महागड्या गाड्या, अभिनेत्यापेक्षा अधिक कमाई, पाहा त्याची एकूण संपत्ती किती?

भारतीय नृत्यदिग्दर्शक, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक प्रभुदेवा (Prabhu Deva) याला कोण ओळखत नाही? तो मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन मिळवणारा नृत्य दिग्दर्शक आहे. प्रभुदेवा शास्त्रीय आणि पाश्चात्य शैलीतील नृत्य प्रकारात तज्ज्ञ आहे.

Net Worth | सलमानसाठी ‘राधे’ बनवणाऱ्या प्रभुदेवाच्या महागड्या गाड्या, अभिनेत्यापेक्षा अधिक कमाई, पाहा त्याची एकूण संपत्ती किती?
प्रभुदेवा
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 8:13 AM

मुंबई : भारतीय नृत्यदिग्दर्शक, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक प्रभुदेवा (Prabhu Deva) याला कोण ओळखत नाही? तो मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन मिळवणारा नृत्य दिग्दर्शक आहे. प्रभुदेवा शास्त्रीय आणि पाश्चात्य शैलीतील नृत्य प्रकारात तज्ज्ञ आहे. चाहते त्याच्या या नृत्याशैलीचे दिवाने आहेत. अनेकांचा तो आवडता नृत्यदिग्दर्शक आहे. फक्त बॉलिवूडच नव्हे तर, त्याने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला प्रभुदेवा केवळ एक बॅकग्राऊंड डान्सर होता आणि त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये कोरिओग्राफि करण्यास सुरुवात केली होती (Know About Prabhu Deva Net worth and income).

कोरिओग्राफर झाल्यानंतर प्रभुदेवाने चित्रपटातून अभिनय करण्यास देखील सुरुवात केली. प्रभुदेवा ‘मुकाबला’ आणि ‘उर्वशी’ या गाण्यांमुळे खूप लोकप्रिय झाला. यानंतर प्रभुदेवाच्या कारकीर्दीचा आलेख झपाट्याने वाढतच गेला आणि त्याचबरोबर त्याची मिळकतही वाढू लागली. caknowledge.com च्या माहितीनुसार प्रभुदेवाची एकूण 137 कोटीं संपत्ती आहे. त्याची 1 महिन्याची मिळकत जवळपास 1 कोटींपेक्षा अधिक आहे, तर वर्षाभरासाठी 12 कोटींपेक्षा अधिक आहे.

म्हैसूरपासून 17 किलोमीटर अंतरावर प्रभुदेवाची मालमत्ता आहे. त्यांनी त्या जागेवर शेती केली आहे. सध्या प्रभुदेवा मुंबईत राहतो. मुंबईतील ग्रीन एकर इमारतीत सध्या त्याचे वास्तव्य आहे.

‘कार’ कलेक्शन

बेंझ जीएलई क्लास

बीएमडब्ल्यू एम 4

ऑडी क्यू 7

बेंटले कॉन्टिनेंटल

(Know About Prabhu Deva Net worth and income)

दिग्दर्शित केलेले चित्रपट

कोरिओग्राफर, अभिनयानंतर प्रभुदेवाने तेलुगू चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट होता सलमान खानचा ‘वाँटेड’. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर त्याने ‘रावडी राठोड’, ‘रमैया वस्तावैया’, ‘आर राजकुमार’, ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘दबंग 3’ आणि ‘राधे’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

घटस्फोटानंतर बिघडली होती आर्थिक परिस्थिती

प्रभुदेवाने 1995मध्ये रामलताशी लग्न केले होते. परंतु, नंतर या दोघांचा घटस्फोट झाले. 2011मध्ये प्रभुदेवाने कायदेशीररित्या रामलताशी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर त्याची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याची बातमी आली होती. घटस्फोटानंतर प्रभुदेवाने रामलताला 10 लाख रुपये पोटगी म्हणून दिले होते.

आगामी प्रकल्प

प्रभुदेवा आता ‘बघीरा’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभुदेवांचा एक अतिशय वेगळ्या अवतार दिसणार आहे. आजवर प्रभुदेवांचा असा अवतार प्रेक्षकांनी पाहिला नव्हता. अद्विक रविचंद्रन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात प्रभुदेवाबरोबर अभिनेत्री अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

(Know About Prabhu Deva Net worth and income)

हेही वाचा :

Disha Patani | FIRच्या वृत्तादरम्यानच दिशा पाटणीने शेअर केला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर रंगली चर्चा!

Video | ‘माझा प्रेमावरचा विश्वासच उडालाय…’, करण-निशाच्या वादावर ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतची प्रतिक्रिया

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.