मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. रणदीप हुड्डा हा गर्लफ्रेंड लिन लेशराम हिच्यासोबत लग्न करतोय. विशेष म्हणजे यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसतंय. रणदीप हुड्डा हा लिन लेशराम हिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठा आहे. रणदीप हुड्डा याच्या लग्नाबद्दल ऐकल्यापासून सर्वांनाच त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल जाणून घ्यायचे आहे. नुकताच रणदीप हुड्डा याचे काही फोटो लग्नातील कार्यक्रमांचे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये हे मित्रांसोबत धमाल करत असल्याचे फोटोंमधून दिसत आहे.
रणदीप हुड्डा आणि लिन लेशराम यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. रणदीप हुड्डा याची होणारी पत्नी लिन लेशराम हिने अनेक बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. इतकेच नाही तर लिन लेशराम ही एक व्यवसायिक देखील आहे. Shampoo Sana नावाचा एक ज्वेलरी ब्रांड ती चालवते. लिन लेशराम ही 37 वर्षांची आहे तर रणदीप हुड्डा हा 47 वर्षांचा आहे.
लिन लेशराम हिने प्रियांका चोप्रा हिच्या मेरी कॉम आणि करीना कपूर हिच्या चित्रपटात काम केले. यासोबत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. काही शोमध्येही लिन लेशराम हिने भाग घेतलाय. रणदीप हुड्डा याने काही खास फोटो शेअर करत लिन लेशराम हिच्यासोबत लग्न करत असल्याचे जाहिर केले.
रणदीप हुड्डा याच्यासोबत लग्न ठरल्यापासून लिन लेशराम ही चर्चेत आहे. रणदीप हुड्डा आणि लिन लेशराम यांचे लग्न मणिपूरमध्ये पार पडत आहे. यांच्या लग्नाची जय्यत तयारी ही बघायला मिळतंय. रणदीप हुड्डा याचे काही जवळचे मित्र या लग्नात सहभागी होतील. बाॅलिवूड स्टार देखील या लग्नात उपस्थित राहणार आहेत.
रणदीप हुड्डा याने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रणदीप हुड्डा याने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना आवडलेले दिसत आहेत. रणदीप हुड्डा याची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणदीप हुड्डा याच्या लग्नाकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळतंय.