अखेर ‘हा’ ओरी आहे तरी कोण ज्याचे प्रत्येक अभिनेत्रीसोबत आहेत अत्यंत क्लोज फोटो, अत्यंत मोठा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून ओरी हा तूफान चर्चेत आहे. ओरी याचे अनेक अभिनेत्रींसोबतच खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ओरी हा प्रत्येक बाॅलिवूड पार्टीमध्ये देखील सहभागी असतो.
मुंबई : ओरहान अवतरमणी उर्फ ओरी हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ओरी हा प्रत्येक बाॅलिवूड पार्टीमध्ये दिसतो. फक्त दिसतच नाही तर बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींसोबत अत्यंत क्लोज होऊन तो फोटो देखील काढतो. ओरी आणि बाॅलिवूड अभिनेत्रींचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामुळेच अनेकांना प्रश्न पडलाय की, बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत नेहमीच क्लोज होऊन फोटो काढणारा हा ओरी आहे तरी नेमका कोण? कारण याचे सतत फोटो व्हायरल होतात.
कोणतीच एक विशिष्ट अशी अभिनेत्री नाही तर दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, माधूरी दीक्षित, कियारा अडवाणी, सारा अली खान, कतरिना कैफ इतकेच नाही तर थेट नीता अंबानी यांच्यासोबत देखील ओरी याचा फोटो बघायला मिळतो. थेट करण जोहर यानेच आता सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना ओरी याच्याबद्दल थेट प्रश्न विचारला.
करण जोहर याने थेट म्हटले की, हा ओरी नेमका कोण आहे, त्याच्यासोबत नेहमीच अभिनेत्रींचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यावर स्पष्टपणे सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना देखील उत्तर देता आले नाही. ओरी हा नेमका काय जाॅब करतो, त्याचे करिअर नेमके काय याबद्दल कोणाला फार काही जास्त माहिती नाहीये.
बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत नेहमीच फोटोमध्ये दिसणारा हा ओरी असा तसा कोणी नसून कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे ओरी याच्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत. ओरी याचे वडील अनेक कंपन्यांचे सीईओ आहेत. फक्त हेच नाही तर अनेक मोठ्या व्यवसायांमध्ये याचा बक्कळ पैसा लागलेला आहे.
ओरी याची एका वर्षाची कमाई तब्बल 2 कोटी आहे. तो अनेक कंपन्यांचा मालक आहे. अंबानी यांच्या कंपनीमध्ये ओरीच्या कंपनीचे खूप जास्त शेअर असल्याची देखील माहिती मिळत आहे. ओरी याचे फॅशन व्यवसायात देखील मोठे पैसे लावले आहेत. यामुळेच ओरी हा प्रत्येक पार्टीमध्ये उपस्थित असतो आणि अभिनेत्रींसोबत फोटो काढताना दिसतो.
अनन्या पांडे आणि सारा अली खान यांनी मात्र, नेमकी ओरी याची ओळख लपवण्याचा का प्रयत्न केला यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अशी एक चर्चा आहे की, ओरी हा चित्रपटांमध्ये देखील आपला पैसा लावतो. यामुळेच बाॅलिवूड कलाकार हे त्याच्यासोबत चांगले रिलेशन ठेवतात. ओरी याच्या अनेक पिढ्या या व्यावसायात असल्याचे देखील सांगितले जाते.