बॉलिवूडच्या व्हिलनच्या प्रेमात कशी पडली रुपाली ? जाणून घ्या आशिष विद्यार्थी – रुपाली बरूआ यांची लव्हस्टोरी
Ashish Vidyarthi And Rupali Barua Love Story : आशिष विद्यार्थी यांनी आसाममधील रुपाली बरुआसोबत लग्न केले आहे. सध्या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. या दोघांची प्रेमकहाणी तुम्हाला माहीत आहे का ?
मुंबई : दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेतून लोकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. 25 मे रोजी त्यांनी आसाममधील रुपाली बरुआ (Rupali barua) हिच्याशी कलकत्ता येथे लग्न केले. त्या दोघांनी कुटुंबिय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज केले.
आशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यासोबतच लोक हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक दिसत आहेत की दोघांची भेट कशी झाली ? कशी होती त्यांची लव्हस्टोरी ? याबाबत आशिष यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले की ही खूप मोठी कहाणी आहे, परत कधीतरी सांगेन. रुपाली यांच्या भेटीबद्दल आशिष यांनी स्पष्टपणे काही सांगितले नसले तरी काही रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लग्नाआधी एकमेकांना बराच काळ डेट केले आहे.
कशी सुरू झाली लव्ह स्टोरी ?
रिपोर्ट्सनुसार, आशिष व रुपाली या दोघांची पहिली भेट एका फॅशन शूट दरम्यान झाली होती. शूटिंगनंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं. चांगली मैत्री झाल्यानंतर आशिष आणि रुपाली हे एकमेकांना डेट करू लागले होते. गेल्या काही वर्षांपासून ते एकत्र होते, अखेर काल त्यांनी रजिस्टर मॅरेज केले.
फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे रुपाली
आशिष आणि तिच्या नात्याबद्दल बोलताना रुपाली म्हणाली की, काही काळापूर्वी त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. रुपाली बरूआ ही फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे आणि तिचे कलकत्ता येथे एक फॅशन स्टोअर देखील आहे.
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचे पहिले लग्न थिएटर कलाकार आणि गायिका राजोशी बरुआ यांच्याशी झाले होते. मात्र, या दोघांचा बऱ्याच काळापूर्वी झाला होता. त्यानंतर, वयाच्या 60 व्या वर्षी या अभिनेत्याने दुसरे लग्न केले आहे.