1000 पाहुणे, 2500 प्रकारचे खाद्यपदार्थ, 3 दिवस चालणार अनंत अंबानी अन् राधिकाचे लग्न, खास..

Radhika Merchant Anant Ambani pre wedding : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये हा शाही विवाहसोहळा हा पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा हा 2023 मध्ये झाला. आता यांच्या लग्नाची जवळपास तयारी पूर्ण झालीये.

1000 पाहुणे, 2500 प्रकारचे खाद्यपदार्थ, 3 दिवस चालणार अनंत अंबानी अन् राधिकाचे लग्न, खास..
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 2:16 PM

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही नामवंत लोक या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. या लग्ना सोहळ्यासाठी 1000 लोक उपस्थित असणार आहेत. हा शाही विवाहसोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. विशेष म्हणजे हा विवाहसोहळा तब्बल तीन दिवस चालणार आहे. या विवाहसोहळ्याला मार्क जुकरबर्ग, बिल गेट्स, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत अशी मंडळी उपस्थित राहिल.

हा विवाहसोहळा तीन दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान पाहुण्यांच्या खाण्याची विशेष व्यवस्था ही करण्यात आलीये. तीन दिवसांमध्ये तब्बल 2500 पदार्थ पाहुण्यांना वाढले जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणताही पदार्थ परत नसणार आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळी पदार्थ पाहुण्यांसाठी असणार आहेत. खास तयारी याची सुरू आहे.

रिपोर्टनुसार लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांकडून अगोदर फूड चाॅइज मागण्यात आलीये. यावेळी तीन दिवस पाहुण्यांच्या संपूर्ण डाएटकडे लक्ष दिले जाईल. 25 सैफची खास टीमही तयार करण्यात आलीये. या लग्न सोहळ्यात खास इंदोरी पदार्थांना महत्व देण्यात आलंय. प्रत्येक प्रकारचे जेवण पाहुण्यांना मिळणार आहे.

रिपोर्टनुसार नाश्त्यामध्ये 70 पदार्थ असणार आहेत. दुपारच्या जेवणामध्ये 250 आणि रात्रीच्या जेवणामध्ये 250 पदार्थ असणार आहेत. विशेष म्हणजे या तीन दिवसांमध्ये कोणत्याच पदार्थ परत वाढला जाणार नाही, प्रत्येक वेळी वेगवेगळे पदार्थ पाहुण्यांना वाढले जाणार आहेत. स्नॅक्सची देखील पाहुण्यांसाठी खास व्यवस्था ही केली जाणार आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा हा 1 ते 3 मार्चपर्यंत असणार आहे. या लग्नासोहळ्याला 1000 पाहुणे हे उपस्थित असणार आहेत. 2023 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा हा पार पडला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.