तुटलेली चप्पल घालून बिग बॉसमध्ये एन्ट्री, पठ्ठ्याने अख्खा सीजनच जिंकला; कसं आहे सूरजचं लाईफ?
'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले नुकताच झालाय. विशेष म्हणजे या सीजनने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळतंय. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरलाय. रितेश देशमुख हा पहिल्यांदाच बिग बॉसला होस्ट करताना दिसला. विशेष म्हणजे बिग बॉसच्या मंचावर धमाकेदार रितेश बघायला मिळाला.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले पार पडलाय. विशेष म्हणजे हे सीजन सुरूवातीपासूनच धमाका करताना दिसले. 23 जुलै रोजी बिग बॉस मराठीला सुरूवात झाली. निर्मात्यांनी अचानकपणे मोठा निर्णय घेत हे सीजन 70 दिवसांमध्येच संपवण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस हिंदीमुळेच निर्मात्यांना असा निर्णय घेण्याची वेळ आली. वर्षा उसगांवकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार देखील या सीजनमध्ये धमाका करताना दिसले. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निकी तांबोळी हे बिग बॉस मराठी सीजन 5 चे टॉप 3 स्पर्धक ठरले. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण यांच्यात जोरदार टक्कर ही बघायला मिळाली.
सूरज चव्हाण याला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांनी खूप प्रेम दिल्याचे बघायला मिळाले. प्रत्येक आठवड्यात जवळपास सूरज हा नॉमिनेशनमध्ये असायचा. मात्र, असे असतानाही तो नेहमीच सुरक्षित राहत. फिनालेला देखील सूरजला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले आणि सूरज हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरवा. सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. हेच नाही तर सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात देखील तुटलेली चप्पल घालून आणि दोन जोडी कपडे घेऊन दाखल झाला होता. त्यानंतर डिझाईनर सुमैया पठाण हिने आपल्या इच्छेने सूरजला कपडे पाठवले. याबद्दल सूरजला काहीच कल्पना देखील नव्हती. तो तर बिग बॉसच्या घरात दोन जोडी कपड्यांसोबत दाखल झाला होता.
सूरजचा गेम आणि त्याचा स्वभाव प्रेक्षकांना चांगलाच आवडताना दिसला. प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम सूरजला दिले. सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विविध प्रकारचे व्हिडीओ बनून तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सूरजची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. लोक मोठ्या प्रमाणात आता सूरजला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
अनेक राजकिय लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सूरज चव्हाणला शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त राजकिय लोकच नाही तर कलाकार देखील सूरजला शुभेच्छा देताना दिसत आहेत. रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया हिने देखील सूरज चव्हाण याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. बिग बॉस मराठी सीजन 5 ला रितेश देशमुख याने होस्ट केले आहे.